World Cup 2023 : "हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं"; भारताच्या पराभवानंतर बॉलिवूडकरांचा टीम इंडियाला सपोर्ट
World Cup 2023 Final : विश्वचषक सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाला सपोर्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
World Cup 2023 Final : विश्वचषकाच्या फायनलमध्ये (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने भारताचा (India Vs Aus) पराभव करत सहाव्यांदा चषकावर नाव कोरलं. भारताच्या विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगल्यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत. विश्वचषक सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाला सपोर्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
माझ्या टीम इंडियासाठीचा वाईट दिवस : सुनील शेट्टी
सुनील शेट्टीने (Suniel Shetty) इंस्टा स्टोरीवर टीम इंडियाचा (Team India) फोटो शेअर करत लिहिलं आहे,"माझ्या टीम इंडियासाठीचा वाईट दिवस...पण आपल्या #TeamIndia साठी वाईट वाटायला नको.. कारण त्यांनी सलग 10 सामने खेळले आहेत. चांगली गोंलदाजी आणि फलंलाजी करणारी टीम इंडियाची खेळी उत्तमच आहे. मी त्यांच्या मेहनतीचं कौतुक करतो".
अजय देवगनने (Ajay Devgn) टीम इंडियाचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिलं आहे,"टीम इंडिया शेवटपर्यंत उत्तम खेळली. आम्हाला कायमच त्यांचा अभिमान आहे".
करीना कपूरने (Kareena Kapoor) लिहिलं आहे,"फक्त प्रेम आणि आदर.. टीम इंडियाचा खेळ चांगला होता"
रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) टीम इंडियाचा फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे की,"आमचं तुमच्यावर खूप प्रेम असून आम्ही तुमचा आदर करतो. कायमच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत".
We love you, we stand by you, we are proud of you #TeamIndia pic.twitter.com/GNDVEfCxZa
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 19, 2023
हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है : काजोल
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने (Kajol) टीम इंडियाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है...खूप चांगलं खेळलात टीम इंडिया...ऑस्ट्रेलियाचं अभिनंदन".
बोमन ईरानी (Boman Irani) यांनी ट्वीट केलं आहे की,"टीम इंडिया नेहमीच चांगल खेळत आली आहे...आताही ते चांगलच खेळले".
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ट्वीट केलं आहे की,"साहसी प्रयत्नानंतर एक असा पराभव...निळ्या कपड्यातील सर्वच पुरुषांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. अमिभान वाटतोय".
A tough loss after a valiant effort. Commendable performance by the men in blue throughout. Hold your heads high and thank you for the journey. 🇮🇳💪🏽#TeamIndia #CWC23
— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) November 19, 2023
आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"ऑफिसमधला एक वाईट दिवस.. हा विश्वचषकाचा सामना कायमच लक्षात राहील".
View this post on Instagram
संबंधित बातम्या