(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Effect | कोरोना व्हायरसचा बॉलिवूड, हॉलिवूड सिनेमांना फटका; '83' सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर
रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित '83' सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय सिनेमाच्या टीमनं घेतला आहे. रणवीर सिंहने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही महत्त्वाची घोषणा केली आहे.
मुंबई : जगभरातील आणि देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित '83' सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय सिनेमाच्या टीमनं घेतला आहे. 1983 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित 83 हा सिनेमा येत्या 10 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना व्हायरसचं जागतिक संकट लक्षात घेता आता सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही महत्त्वाची घोषणा केली आहे. '83' हा केवळ आमचा सिनेमा नाही तर देशाचा सिनेमा आहे. पण त्यापेक्षा देशाची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. सुरक्षित राहा, काळजी घ्या, आम्ही लवकर परत येऊ, असा संदेश देणारं एक पत्रक रणवीरनं पोस्ट केलं आहे.
83 is not just our film but the entire nation’s film. But the health and safety of the nation always comes first. Stay safe, take care. We shall be back soon! .@kabirkhankk @deepikapadukone @Shibasishsarkar #SajidNadiadwala @vishinduri @ipritamofficial @RelianceEnt pic.twitter.com/wS0Anl8BM2
— Ranveer Singh (@RanveerOfficial) March 20, 2020
कोरोना व्हायरसचा फटका इतरही बॉलिवूड सिनेमांना बसला आहे. यामध्ये त्यात रोहित शेट्टी दिग्दर्शित, अक्षय कुमार स्टारर अॅक्शन पॅक्ड 'सूर्यवंशी' सिनेमाचाही समावेश आहे. सूर्यवंशी 24 मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना व्हायरचा धोका लक्षात घेता सूर्यवंशी सिनेमाचं प्रदर्शन काही दिवसांपूर्वी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
'नो टाईम टू डाय' हा जेम्स बॉन्ड सीरिजचा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे त्याचं प्रदर्शन नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे. यासोबत मिशन इम्पॉसिबलचा पुढचा भाग, डिस्नीचे चित्रपट, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमच्या अनेक बड्या प्रोजेक्ट्सचं प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
- Coronavirus | कनिका कपूरविरोधातील एफआयआरमधून माहिती उघड; 14 मार्चलाच कोरोना झाल्याचं स्पष्ट
- Coronavirus | बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण
- Coronavirus | दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये तर हॉलिवूड सेलिब्रिटीही कोरोनाच्या कचाट्यात
- Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रियांका-दीपिकाकडे WHOचे डायरेक्टर डॉक्टर टेड्रोस यांचं अपील