Coronavirus | दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये तर हॉलिवूड सेलिब्रिटीही कोरोनाच्या कचाट्यात
कोरोनाचा कहर थेट चित्रपटसृष्टीवरही झाला आहे. एवढचं नव्हे तर अनेक हॉलिवूड स्टार्सना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
मुंबई : चीनमधील वुहान शहरातून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रभाव बॉलिवूडवरही दिसून येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच अनेक सेलिब्रिटीही या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जनजागृती करत आहेत. तसेच सोशल मीडियावर अभिनेता दिलीप कुमार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत स्वतःला कोरोनापासून वाचवण्यासाठी आयसोलेशनवर ठेवल्याची माहिती दिली आहे.
97 वर्षीय अभिनेता दिलीप कुमार यांनी आपल्.या ट्विटर अकाउंटवर ट्वीट करत सांगितले की, 'सायरा त्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना पूर्णपणे आयसोलेशनवर ठेवण्यात आलं आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या फॅन्सलाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गरज नसताना घराबाहेर पडणं टाळा आणि आपल्यासोबतच इतरांचीही काळजी घ्या, तसेच आरोग्य विभागाने जारी केलेल्या सर्व सुचनांचं पालन करण्याचंही आवाहन दिलीप कुमार यांनी केलं आहे.
हॉलिवूडवरही कोरोनाचं सावट
हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रीटा विल्सनला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अभिनेता टॉम हँक्स आपल्या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी ऑस्ट्रेलिया येथे गेले होते. जिथे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाली. दरम्यान, टॉम हँक्स आणि त्यांच्या पत्नीला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. ते सोशल मीडियावरून नेहमी आपल्या प्रकृतीबाबत फॅन्सला माहिती देत आहेत. एवढचं नाहीतर जेम्स बॉन्ड सीरिजमधील चित्रपट 'क्वांटम ऑफ सोलेस'मध्ये युक्रेनीची भूमिका साकारलेली अभिनेत्री ओल्गा कुरलेंको हिलादेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर अॅव्हेंजर्स सीरिजमधील अभिनेता इदरीस एल्बा आणि गेम ऑफ थ्रोन्समधील अभिनेता ख्रिस्टोफर हिवजू यालादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
भारतातील अनेक देशांमध्ये 31 मार्चपर्यंत शाळा, कॉलेज आणि चित्रपटगृह बंद करण्यात आलं आहे. मुंबईमध्ये टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांचं शुटिंगही बंद करण्यात आलं आहे. तसेच बॉलिवूडसोबतच हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये अक्षय कुमारचा चित्रपट 'सूर्यवंशी', रणवीर सिंहचा बहुचर्चित चित्रपट '83' आणि जेम्स बॉन्ड सीरीजचा 'नो टाइम टू डाई'चाही समावेश आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रियांका-दीपिकाकडे WHOचे डायरेक्टर डॉक्टर टेड्रोस यांचं अपील
Coronavirus | शेतकरी कर्जमाफी योजनेलाही कोरोना व्हायरसचा फटका