एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रियांका-दीपिकाकडे WHOचे डायरेक्टर डॉक्टर टेड्रोस यांचं अपील

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक सोशल मीडियावर जनजागृती करताना दिसत आहेत. गर्दीत जाणं टाळा, आपले हात सतत स्वच्छ करा यांसारख्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देश आणि विदेशात शाळा, महाविद्यालयं आणि कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडियावरूनही कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तसेच या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक सोशल मीडियावर जनजागृती करताना दिसत आहेत. गर्दीत जाणं टाळा, आपले हात सतत स्वच्छ करा यांसारख्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO)ने देखील सोशल मीडियावरून अनेक सेलिब्रिटींना याबाबत जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे. BLOG | का घाबरशी, कोरोनाशी! WHO चे डायरेक्टर जनरल डॉक्टर टेड्रोस एधानोम यांनी ट्विटरवरून अनेक सेलिब्रिटींना टॅग केलं आहे. त्यांनी सेलिब्रिटींना 'सेफ हँड्स चॅलेंज' स्विकारण्याची विनंती केवी आहे. टेड्रोस यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ग्लोबल स्टार्सनी सेफ हँड्स चॅलेंज स्विकारून आपला व्हिडीओ शेअर करावा. तसेच आपल्या सोबत आणखी तीन व्यक्तींना हे चॅलेंज द्यावं. आपण सर्व एकत्र येऊन या व्हायरसशी दोन हात करू शकतो.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरीच आहेत दीपिका आणि प्रियांका कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये मॉल्स, चित्रपटगृह, जिम आणि स्विमिंग पूल्स बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट भूल भुलैया 2चं शुटिंगही थांबवण्यात आलं आहे. एवढचं नाहीतर 24 मार्च रोजी रिलीज करण्यात येणारी अक्षय कुमार आणि कटरीना कैफ स्टारर फिल्म सूर्यवंशीची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांनी देखील घरीच थांबवण्याला पसंती दिली आहे. दीपिकाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत सांगितलं आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती फ्री टाइमचा सदुपयोग करत आहे. तसेच आपला वॉर्डरोब स्वच्छ करत आहे. संबंधित बातम्या :  Coronavirus | कोल्हापुरात कोरोना संशयित वृद्ध नागरिकाचा मृत्यू Coronavirus | शेतकरी कर्जमाफी योजनेलाही कोरोना व्हायरसचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget