एक्स्प्लोर
'छोटे सरकार' सिनेमातील गाण्यामुळे गोविंदा,शिल्पा शेट्टी अडचणीत
मुंबईः 'एक चुम्मा तू मुझको उधार दे दे, बदले में यूपी, बिहार ले ले' या 1996 साली आलेल्या 'छोटे सरकार' सिनेमातल्या गाण्यामुळे गोविंदा आणि शिल्पा शेट्टी आत्ता अडचणीत आले आहेत.
या गाण्यातून यूपी आणि बिहार या दोन राज्यांचा अपमान करण्यात आल्याची तक्रार 2000 साली दाखल करण्यात आली होती. पण वारंवार नोटीस बजावूनही शिल्पा शेट्टी आणि गोविंदा कोर्टात हजर राहिले नाहीत.
एकदा त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही बजावण्यात आला होता. पण त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. आता मात्र त्यांना 18 ऑक्टोबरला कोर्टात हजर राहण्यासाठी निर्वाणीचे आदेश दिले आहेत.
एवढंच नव्हे तर या सिनेमाचे दिग्दर्शक विमल कुमार यांच्याविरोधातही अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आला आहे. या गाण्याचे संगीतकार, गायक-गायिका या सर्वांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement