एक्स्प्लोर

Anasuya Sengupta : 'Cannes 2024'मध्ये भारताने रचला इतिहास; अनसूया सेनगुप्ता ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय!

Anasuya Sengupta Win Best Actress Award : भारताच्या अनसूया सेनगुप्ताने इतिहास रचला आहे. अनसूया सेनगुप्ताला 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

Anasuya Sengupta Win Best Actress Award : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024' (Cannes Film Festival 2024) सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारतातील अनेक अभिनेत्री यंदाच्या 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये भारताच्या अनसूया सेनगुप्ताने (Anasuya Sengupta) इतिहास रचला आहे. कोलकातात राहणाऱ्या अनसूया सेनगुप्ताला 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पुरस्कार पटकावणारी ही पहिली भारतीय ठरली आहे. अनसूया सेनगुप्ताला 'शेमलेस' या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. अनसूया सेनगुप्ताच्या या यशानंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

अनसूया सेनगुप्ताने कोणाला समर्पित केला आपला अवॉर्ड? 

अनसूया सेनगुप्ताने 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचं नाव काढलं आहे. अनसूया सेनगुप्ताने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. कान्समध्ये पुरस्कार पटकावणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. अनसूया सेनगुप्ताला तिच्या 'शेमलेस' या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटात अनसूया सेनगुप्ताने एक सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे. अनसूया सेनगुप्ताचा 'शेमलेस' हा चित्रपट बुल्गारियाचे सिनेनिर्माते कॉन्स्टेंटिन बोजानो यांनी दिग्दर्शित केला आहे. अनसूया सेनगुप्ताने हा पुरस्कार जगभरातील LGBT समुदायाला समर्पित केला आहे. अनसूया सेनगुप्ताला सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटी शुभेच्छा देत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Anasuya Sengupta (@cup_o_t)

अनसूयाने प्रोडक्शन डिझायनर म्हणून मिळवली लोकप्रियता

कोलकातामध्ये राहणाऱ्या अनसूया सेनगुप्ताने प्रोडक्शन डिझायनर म्हणून आपली लोकप्रियता मिळवली आहे. अनसूया सेनगुप्ताने 2009 मध्ये बंगाली चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनसूया मुंबईत शिफ्ट झाली. मुंबईत तिचा भाऊ अभिषेक सेनगुप्ता चित्रपटांमध्ये काम करायचा. अनसूया सेनगुप्ताला अभिनयासाठी जास्त विचारणा झाली नाही. आर्ट डिपार्टमेंटमध्ये ती जोडली गेली.

संबंधित बातम्या

Avneet Kaur : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये अवनीत कौरचं एक हटके काम अन् लोक म्हणाले, 'ही आहे भारतीय संस्कृती'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget