(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rakhi Sawant : सोमीला आदिलपासून वाचवा, राखी पुन्हा बरळली; तीच कोरोना व्हायरस, आदिलनेही दिलं जशास तसं उत्तर
आदिल खानने केलेल्या दुसऱ्या लग्नानंतर राखी पुन्हा एकदा चर्चेत आलीये. दरम्यान पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Adil Khan and Somi Khan on Rakhi Sawant : आदिल खानने (Adil Khan Durrani) लग्न केल्यानंतर राखी सावंत (Rakhi Sawant) आणि आदिल खान यांच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. त्यातच आता पुन्हा एकदा राखीने केलेल्या वक्तव्यावर आदिलने ती कोरोना व्हायरस असल्याचं म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉस 12 (Bigg Boss 12) फेम सोमी खान (Somi Khan) हिच्यासोबत आदिलने लग्न केलं. सुरुवातीला त्या दोघांनीही त्यांच्या लग्नाविषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली नाही. त्यानंतर दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली.
आदिल आणि सोमीने नुकतीच टेलीमसाला या चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने दिलेल्या सल्ल्यावर भाष्य केलं आहे. सोमीला आदिलपासून दूर ठेवा असा सल्ला राखीने दिला होता. यावर बोलताना सोमीने या मुलाखतीमध्ये म्हटलं की, माझ्यासाठी हे अजिबात महत्त्वाचं नाहीये, त्यामुळे मी यावर बोलू इच्छित नाही. तर यावर आदिलने बोलताना म्हटलं की, राखी ही कोरोना व्हायरस आहे, तिलाच या जगापासून लांब ठेवा.
राखी ही कोरोना व्हायरस आहे - आदिल खान
राखीच्या या सल्ल्यावर बोलताना आदिलनं म्हटलं की, राखी जर असं काही बोलली नाही तर फार बरं होईल. तसंही राखीपासून आधी हे जग वाचू दे हिच खूप मोठी गोष्ट आहे. सोमीला तर वाचवेनच आणि सोमी माझ्यासोबत सुरक्षित आहे. राखी ही करोना व्हायरससारखी आहे. त्यामुळे तिच्यापासून आधी हे जग वाचू दे. मुंबई, भारत खूप शांत होईल. तिनं इथून निघून जावं, यामुळे इथे लोकं सुखी होतील, असं आदिलने म्हटलं.
मला माझ्या नवऱ्यासोबत सर्वात जास्त सुरक्षित वाटतं - सोमी खान
राखीच्या या सल्ल्यावर बोलताना सोमीनं म्हटलं की, माझ्यासाठी कोण काय बोलतं हे महत्त्वाचं नाहीये. मला याबाबत काही माहित देखील नाही. त्यामुळे मी यावर काही बोलू इच्छित नाही. पण मला सर्वात जास्त कोणाबरोबर चांगलं आणि सुरक्षित वाटत असेल तर ते माझ्या नवऱ्यासोबत वाटतं. याआधी देखील जेव्हा सोमीला राखीविषयी विचारण्यात आलं होतं तेव्हा सोमीनं म्हटलं की, मला आदिलच्या भूतकाळात काय झालं याच्याशी काही संबंध नाही, पण आता तो माझा वर्तमान आणि भविष्य आहे.