(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Siddharth Tweet : सायना नेहवालवर केलेलं आक्षेपार्ह ट्वीट भोवलं, दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ विरोधात गुन्हा दाखल
Siddharth Tweet : सायना नेहवाल विरुद्ध वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल हैदराबाद पोलिसांनी सिद्धार्थवर गुन्हा दाखल केला आहे.
Siddharth Tweet : प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) विरोधात वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल हैदराबाद पोलिसांनी सिद्धार्थवर (Siddharth) आज (बुधवारी) गुन्हा दाखल केला आहे. हैदराबादमधील एका महिलेने सिद्धार्थविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यामुळे कलम 509 च्या आधारे सिद्धार्थवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Siddharth booked by Hyderabad Police for derogatory comment against Saina Nehwal
— ANI Digital (@ani_digital) January 12, 2022
Read @ANI Story | https://t.co/L3U2Cw0AyI#Siddharth #SainaNehwal pic.twitter.com/wFjbzVhfBU
काय आहे प्रकरण
पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाभंग प्रकरणाबद्दल सायना नेहवालने ट्वीट केले होते. सायनाच्या ट्वीटवर भाष्य करत सिद्धार्थने त्याचे मत मांडले. सिद्धार्थने या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे सध्या त्याला अनेक जण ट्रोल करत आहेत. सिद्धार्थने त्याच्या ट्वीटमध्ये 'शेम ऑन यू रिहाना' असंही लिहिले होते. सिद्धार्थने ट्वीटमध्ये वापरलेल्या शब्दाचा निषेध करत महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबई पोलीस आणि ट्विटरकडे सिद्धार्थच्या या ट्वीटवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
No nation can claim itself to be safe if the security of its own PM gets compromised. I condemn, in the strongest words possible, the cowardly attack on PM Modi by anarchists.#BharatStandsWithModi #PMModi
— Saina Nehwal (@NSaina) January 5, 2022
सायनाने दिली होती प्रतिक्रिया
सायना नेहवालने सिद्धार्थच्या ट्वीटला उत्तर देत नाराजी व्यक्त केली होती. सायना म्हणाली, "मला माहीत नाही त्याला काय म्हणायचयं. मला तो अभिनेता म्हणून आवडायचा पण हे त्याने योग्य केलेलं नाही. तो अधिक चांगल्या शब्दांत व्यक्त करू शकला असता. पण हे ट्विटर आहे. ट्विटरवर आक्षेपार्ह शब्दांची दखल घेतली जाते". सायनाचे पती पारुपल्ली कश्यप यांनीदेखील सिद्धार्थच्या आक्षेपार्ह ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. पारुपल्ली ट्वीट करत म्हणाले,"तुमची मतं व्यक्त करा..पण चांगल्या शब्दांत".
सायना पुढे म्हणाली, सिद्धार्थने त्याने केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. मला आनंद आहे की, त्याने हे कबूल केले आहे.
संबंधित बातम्या
Saina Nehwal On Siddharth’s Tweet : सिद्धार्थच्या ट्वीटवर सायनाचं प्रतिउत्तर; म्हणाली, मला तो अभिनेता म्हणून आवडायचा पण...
राज्य नाट्य स्पर्धेला कोरोनाचा फटका, स्पर्धा तूर्तास ढकलली पुढे
Mahesh Manjrekar Movie : मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा'ला महिला आयोगाचा विरोध, केंद्राकडे केली तक्रार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha