Mahesh Manjrekar Movie : मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा'ला महिला आयोगाचा विरोध, केंद्राकडे केली तक्रार
Mahesh Manjrekar Movie : येत्या शुक्रवारी सिनेमागृहांत महेश मांजरेकरांचा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Mahesh Manjrekar Movie : 'अंतिम' सिनेमानंतर महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा'
(Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha) हा मराठी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच 14 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अशातच चित्रपटाबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे.
'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलगा आणि महिलेची आक्षेपार्ह स्थितीतली दृश्यं दाखविण्यात आली होती. यामुळेच राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. हा ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
View this post on Instagram
सिनेमाचा ट्रेलर महेश मांजरेकरांनी शेअर करत लिहिले होते,"मुंबईच्या जंगलातला हा धूर कुणाला सुखासुखी जगून नाय द्यायचा..सगळ्यांची वाट लागणार..! काँक्रीटच्या जंगलातलं वास्तव..पहा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' चित्रपटाचा ट्रेलर..!". महेश मांजरेकर यांच्या आजवरच्या चित्रपटांची लोकप्रियता लक्षात घेता 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा सिनेमादेखील सिनेमागृहात धुमाकूळ घालेल.
संबंधित बातम्या
Sunil Shetty : सुनील शेट्टीचे OTTवर पदार्पण, साकारणार अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका
Pushpa Box Office : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'ची हिंदींतही कमाल; 80 कोटींची कमाई, 100 कोटींकडे वाटचाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha