राज्य नाट्य स्पर्धेला कोरोनाचा फटका, स्पर्धा तूर्तास ढकलली पुढे
State Drama Competition : कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.
State Drama Competition : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनामुळे प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेल्या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जानेवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या अनेक सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अशातच राज्य नाट्य स्पर्धादेखील शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे.
ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून राज्य नाट्य स्पर्धा पुढे घेण्यात यावी, अशी अनेक संघांनी विनंती केली होती. त्यामुळेच येत्या 15 जानेवारी पासून सुरू होणारी राज्य नाट्य स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे संसर्ग कमी झाल्यानंतर नाट्यकर्मींच्या आवडत्या राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्यभरात 15 जानेवारीपासून 60 व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ होणार होता. स्पर्धेची प्राथमिक फेरी परशुराम सायिखेडकर नाट्यगृहात रंगणार होती. परंतू वाढणाऱ्या कोरोना रूग्णसंख्येमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलेले सिनेमे
शाहिद कपूरचा 'जर्सी', एसएस राजामौली यांचा 'आरआरआर', चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित 'पृथ्वीराज' सिनेमाचा समावेश आहे. बाहुबली स्टार प्रभासच्या 'राधे श्याम' सिनेमाचीदेखील सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
Mahesh Manjrekar Movie : मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा'ला महिला आयोगाचा विरोध, केंद्राकडे केली तक्रार
Rajesh Tope : राज्यात आणखी 15 ते 20 दिवस शाळा बंद राहणार ; राजेश टोपे यांची माहिती
Sunil Shetty : सुनील शेट्टीचे OTTवर पदार्पण, साकारणार अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha