(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Laal Singh Chaddha : बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला 'लाल सिंह चड्ढा' ओटीटीवर होणार रिलीज; कधी? आणि कुठे? जाणून घ्या...
बॉयकॉट लाल सिंह चड्ढा हा ट्रेंड देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला.
Laal Singh Chaddha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिर खानच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी केली. बॉयकॉट लाल सिंह चड्ढा हा ट्रेंड देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. हा चित्रपट ज्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, ते आता घरबसल्या पाहू शकणार आहेत. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 20 ऑक्टोबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाला. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.70 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 8.5 कोटींचा व्यवसाय केला होता. आमिरसोबतच या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर, मोना सिंह आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
लाल सिंह चड्ढा चित्रपटावर बॉयकॉट ट्रेंडचा परिणाम
सध्या प्रेक्षक थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहण्यास प्राधान्य देतात. चित्रपटाला जर चित्रपटगृहात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही तरी हे चित्रपट ओटीटीवर प्रेक्षक बघतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तापसी पन्नूचा शबास मिथू हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही पण नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्यानंतर हा चित्रपट भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाला. लाल सिंह चड्ढा आणि अक्षयच्या रक्षा बंधन या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा फटका बसला . त्यामुळे हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या लाल सिंह चड्ढाला आता ओटीटी रिलीज होणार आहे. ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: