एक्स्प्लोर

Laal Singh Chaddha : आमिरच्या 'लाल सिंह चड्ढा'ला ओटीटी रिलीजसाठी खरेदीदार मिळेना; नेटफ्लिक्सकडून करार रद्द

Laal Singh Chaddha : आमिर खानच्या चाहत्यांना लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट ओटीटीवर बघता येईल की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Laal Singh Chaddha :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आमिर खानच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर अनेक नेटकरी करत आहेत. बॉयकॉट लाल सिंह चड्ढा हा ट्रेंड देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शवर झाला. आमिर आणि अभिनेत्री करीना कपूरच्या काही जुन्या वक्तव्यांमुळे या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा निर्णय काही नेटकऱ्यांनी घेतला होता. आमिरचे काही चाहते हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची वाट बघत होते. पण आता त्याच्या चाहत्यांना हा चित्रपट ओटीटीवर बघता येईल की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी खरेदीदार मिळत नाहीये. प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनं देखील हा चित्रपट रिलीज करण्यास नकार दिला आहे. 

सध्या प्रेक्षक थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहण्यास प्राधान्य देतात. चित्रपटाला जर चित्रपटगृहात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही तरी हे चित्रपट ओटीटीवर प्रेक्षक बघतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तापसी पन्नूचा शबास मिथू हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही पण  नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्यानंतर हा चित्रपट भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाला. सध्या लाल सिंह चड्ढा आणि अक्षयच्या रक्षा बंधन या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा फटका बसताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या लाल सिंह चड्ढाला आता ओटीटी रिलीजसाठी एकही खरेदीदार मिळत नाहीये. 

नेटफ्लिक्सनं रद्द केला करार
एका वेब साईटनं दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सनं लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत केलेला करार रद्द केला आहे. आमिर खान आणि वायकॉम 18 हे चित्रपटाच्या डिजीटल राइट्ससाठी 200 कोटींची मागणी करत होते. पण लाल सिंह चड्ढा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानं नेटफ्लिक्सनं हा चित्रपट त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यास नकार दिला आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की, बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला हा चित्रपट ओटीटीवर कोण बघेल? याच कारणामुळे सध्या या चित्रपटाला ओटीटी रिलीजसाठी खरेदीदार मिळत नाहीये. 

लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाला आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.70 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 8.5 कोटींचा व्यवसाय केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget