Athiya Shetty And KL Rahul : अथिया-केएल राहुल यांच्या लग्नाची लगबग सुरु! ‘या’ खास ठिकाणी घेणार सात फेरे...
Athiya Shetty And KL Rahul : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KLRahul) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Athiya Shetty And KL Rahul : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KLRahul) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दोघांमधील नातं आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. केएल राहुल आणि अथिया मीडियामध्ये एकमेकांबद्दल बोलणे टाळतात, परंतु दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता ही जोडी लवकरच सात फेरे घेणार आहे. लग्न सोहळ्यासाठी त्यांनी एका खास ठिकाणाची निवड केली आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, त्यांचे लग्न एखाद्या महागड्या रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये होणार नसून, खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) बंगल्यात होणार आहे. सुनील शेट्टीच्या बंगल्याचे नाव 'जहाँ' असे आहे. केएल राहुल आणि अथिया या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न बंधनात अडकू शकतात. खंडाळ्यातील हा बंगला सुनील शेट्टी यांच्यासाठी देखील खूप खास आहे. त्यांनी 17 वर्षांपूर्वी हा बंगला बांधला आहे. खंडाळास्थित हा बंगला मोठ्या परिसरात पसरलेला असून, त्याच्या आतील भागात अनेक झाडे लावण्यात आली आहेत.
अथिया आणि राहुल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये!
चाहत्यांना अथिया आणि राहुलची जोडी खूप आवडते. अथिया शेट्टी (Athiya Shetty) अनेकदा केएल राहुलसोबत क्रिकेट टूरवर जाताना दिसते. दोघेही एकमेकांना मागील 3 वर्षांपासून डेट करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही एकत्र एकाच घरात शिफ्ट झाले आहेत. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे बोलले जात आहे. त्यांना वांद्रे येथील कार्टर रोडवर एक घर घेतले आहे. ही जोडी त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.
बॉलिवूड-क्रिकेट जगतातील दुसरे ग्रँड लग्न!
या लग्नात साग्भागी होणार्या पाहुण्यांना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपला वेळ राखून ठेवावा, असे सांगण्यात आल्याचे कळते आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनंतर अथिया शेट्टी आणि राहुल यांचे बॉलिवूड-क्रिकेट जगतातील दुसरे ग्रँड लग्न असणार आहे.
मुलांना ब्रेक मिळाला की लग्न करतील : सुनील शेट्टी
सुनील शेट्टी यांना मुलीच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, 'मला वाटतं ते मुलांनी ठरवलं की घडेल. राहुल सध्या आशिया कप, वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका टूर, ऑस्ट्रेलिया टूरमध्ये व्यस्त आहे. जेव्हा मुलांना ब्रेक मिळेल, तेव्हाच लगन होईल. इतर दिवसांत लग्न होऊच शकत नाही.’
अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो'मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये अथियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अथियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळालीय.
हेही वाचा:
Athiya Shetty : के. एल. राहुलसोबत लग्नाच्या चर्चेवर अथियानं सोडलं मौन; म्हणाली, 'मला या लग्नाला...'