एक्स्प्लोर

Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे.

Maharashtra Farmer Loan Waiver मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर (Maharashtra Farmer Loan Waiver) करतील, असे विधान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत केले
 
कलम 260 अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. चर्चेत सत्तारूढ व विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी सहभाग घेतला होता. राज्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी महाराष्ट्राने 2025 ते 2029 या कालावधीसाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण जाहीर केले असून असे धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. (Farmer Of Maharashtra)

‘माय ॲग्री’ धोरणातून एआय, ड्रोन व रोबोटिक्सचा वापर- (Maharashtra Farmer Loan Waiver)

राज्यात हवामानातील अनिश्चितता, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, उत्पादन खर्चातील वाढ व बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेती अधिक जोखमीची झाली आहे. या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उपाय म्हणून ‘माय ॲग्री’ एआय धोरण आखण्यात आले आहे. या अंतर्गत हवामानाचा अचूक अंदाज, कीड-रोगाचा पूर्व इशारा, सिंचन व खत व्यवस्थापन मार्गदर्शन, बाजारभावाचा अंदाज, पीक उत्पादन वाढ होईल. यासाठी एआय, जनरेटिव्ह एआय, ड्रोन व रोबोटिक्सचा वापर होणार आहे. राज्यस्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता व ॲग्रीटेक नावीन्य केंद्र स्थापन करण्यात आले असून चारही कृषी विद्यापीठांत एआय संशोधन व इन्क्युबेशन सुविधा उभारल्या जाणार आहेत.

‘महाविस्तार’ ॲपला 30 लाख शेतकऱ्यांचा प्रतिसाद- (Maharashtra Farmer Loan Waiver)

कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार’ मोबाईल ॲपचा ३० लाखांहून अधिक शेतकरी वापर करत आहेत. या ॲपद्वारे पीक लागवड, रोगनियंत्रण, पाणी-खत व्यवस्थापन व बाजारभावाची माहिती घरबसल्या मिळते. 22-23 फेब्रुवारी रोजी मुंबईत ‘AI4Agri’ जागतिक परिषद पार पडली असून त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

पीक विमा, नुकसानभरपाई व अतिवृष्टी मदत- (Maharashtra Farmer Loan Waiver)

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील 9 वर्षांत सुमारे ₹37,500 कोटींपेक्षा जास्त नुकसानभरपाई देण्यात आली आहे. खरीप 2025-26 पासून उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे. ‘बीड पॅटर्न’ 80-110 मॉडेल राबवून विमा कंपन्यांच्या नफ्यावर 20 टक्क्यांची मर्यादा घालण्यात आली आहे. वन्यप्राणी व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याची माहितीही कृषीमंत्र्यांनी दिली. फेब्रुवारी ते डिसेंबर 2025 या काळात अतिवृष्टीमुळे 1.36 कोटी शेतकरी बाधित झाले. 1.06 कोटी हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यासाठी ₹20,194 कोटींची मदत जाहीर करण्यात आली असून त्यापैकी ₹15,661 कोटी वितरित करण्यात आले आहेत. मदतीची मर्यादा 2 हेक्टरवरून 3 हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मोफत वीज, पानंद रस्ते आणि कर्जमाफी- (Maharashtra Farmer Loan Waiver)

‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ अंतर्गत साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्यात येत आहे. दोन वर्षांत ₹41,415 कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना’मार्फत शेतकऱ्यांना शेतापर्यंत रस्ता सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या योजना- (Maharashtra Farmer Loan Waiver)

‘गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना’ अंतर्गत 3 वर्षांत ₹374.92 कोटींचे अनुदान देण्यात आले असून  ‘पीएम किसान’ योजनेत 1.19 कोटी लाभार्थी; 21 हप्त्यांत सुमारे ₹39,000 कोटी वितरित करण्यात आले आहे.  ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेत 7 हप्त्यांत सुमारे ₹13,000 कोटी वितरित करण्यात आले असून 8वा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे.

गुणवत्ता नियंत्रणात कडक कारवाई- (Maharashtra Farmer Loan Waiver)

अप्रमाणित बियाणे, खते व कीटकनाशकांविरोधात 145 फौजदारी कारवाया, 785 खटले दाखल, 1,164 परवाने रद्द व 1,527 परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री भरणे यांनी सभागृहात दिली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
Bhendwal Ghatmandni Bhavishyvani 2026: देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण...; भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणते भाकीत वर्तवले?
देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण...; भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणते भाकीत वर्तवले?
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
Nashik Crime News: घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
Nagpur Crime News: एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
Fairness Cream Alert : सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड,
सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड
Embed widget