यामी गौतम करतेय त्वचा रोगाचा सामना; काय आहे 'केराटोसिस पिलेरिस'? सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) नुकतीच तिला झालेल्या त्वचेच्या केराटोसिस पिलेरिस (Keratosis Pilaris) या आजाराबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) नुकतीच तिला झालेल्या त्वचेच्या केराटोसिस पिलेरिस (Keratosis Pilaris) या आजाराबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. हा एक त्वचेच्या रोगाचा प्रकार. गेली अनेक वर्ष यामी या आजाराचा सामना करत आहे. यामीने या आजारबद्दल भीती आणि असुरक्षितता न वाटून घेता त्याचा सामना कसा करावा हे सोशल मीडियावर सांगितले आहे. एका फोटो शूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करून यमीने तिच्या त्वचेवर असलेल्या लहान पॅच आणि कोरडेपणाबद्दल सांगितले.
सोशल मीडियावर यामीने केली खास पोस्ट
यामीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'मी नुकतेच एका फोटोशूटसाठी फोटो काढाले. ते फोटो पोस्ट प्रोडक्शनच्या प्रक्रियेसाठी जात होते. त्यामध्ये माझा स्किनचा आजार म्हणजेच केराटोसिस पिलेरिस लपवला जाणार होता. मी स्वत:ला सांगितले की, यामी तु हे सत्य का स्विकारत नाही? ज्यांना या गोष्टीबद्दल माहित नाही त्यांच्यासाठी सांगते की, हा त्वचेच्या संबंधीत आजार आहे. यामध्ये चेहऱ्यावर लहान पिंपल्स येतात. हे इतके वाईट नाहिये पण तुमच्या शेजारच्या काकू किंवा तुमचे विचार याला वाईट बनवू शकतात. आता बऱ्याच वर्षांपासून मी याचा सामना केला आणि आज शेवटी, मी माझ्या सर्व भीती आणि असुरक्षितता सोडून देण्याचा निर्णय घेतला. तसेच मी माझ्या दोषाला मनापासून स्विकारायचे ठरवले. म्हणून मी माझे सत्य तुमच्यासोबत शेअर करण्याचे धाडस केले.'
View this post on Instagram
यामीने बाला, सनम रे, काबिल, विकी डोनर आणि उरी या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामीने चांद के पार चलो या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. काही दिवसांपूर्वी यामीचा भूत पोलिस हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये यामीसोबत अर्जुन कपूर , सैफ अली खान आणि जॅकलिन फर्नांडिस या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली
यामीचे आगामी चित्रपट
यामीने काही दिवसांपूर्वी ‘लॉस्ट’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. ती लवकरच ‘दसवीं’ आणि ‘अ थर्सडे' या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
