Sanjay Dutt : मुलींसमोर ‘कूल’ दिसावं म्हणून ड्रग्स घेण्यास सुरुवात केली, संजूबाबाला लोक ‘चरसी’ म्हणून लागले अन्...
Sanjay Dutt : संजय दत्त सध्या त्याच्या ‘KGF2’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत आहे.
Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे (Sanjay Dutt) आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत संजय दत्तला तो काल आठवला, जेव्हा लोक त्याला 'चरसी' म्हणायचे. तो पुनर्वसन केंद्रातून परतला होता, तेव्हाची ही वेळ होती. संजय दत्त सध्या त्याच्या ‘KGF2’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. यश (Yash), रवीना टंडन (Raveena Tondon), प्रकाश राज (Prakash Raj), मालविका अविनाश (Malvika Avinash), जॉन कोकेन आणि सरस स्टारर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत आहे.
संजय दत्त त्याच्या ड्रग्जच्या व्यसनाबद्दल नेहमीच उघडपणे बोलतो. नुकत्याच एका मुलाखतीत संजय दत्त म्हणाला की, 'मी खूप लाजाळू होतो, विशेषत: मुलींबाबत, त्यामुळे मी फक्त कूल दिसण्यासाठी ड्रग्ज सुरुवात केली. ड्रग्ज घेऊन, कूल वाटायचे आणि बिनधास्त मुलींसोबत बोलायचो.'
लोक चरसी म्हणू लागले..
संजय दत्त म्हणाला, 'माझ्या आयुष्यातील 10 वर्षे एका खोली वजा बाथरूममध्ये गेली. मला शूटिंगमध्ये काहीच रस नव्हता. पण, तेच जीवन आहे आणि त्यामुळेच सर्व काही बदलले. जेव्हा मी या सगळ्यातून बाहेर पडून घरी परत आलो, तेव्हा लोक मला चरसी म्हणू लागले. मला खूप वाईट वाटायचं. हे सगळं थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवं असं नेहमी वाटायचं.’
पिळदार शरीरयष्टी बनवत केले साऱ्यांना दंग!
संजय दत्तने सांगितले की, यानंतर तो वर्कआउट करू लागला. संजूबाबाला ही इमेज पुसायची होती आणि मग हळूहळू तो असा व्यक्ती बनला ज्याला पाहून लोक म्हणून लागले, ‘वाह काय शरीर आहे.’ संजय दत्तचा ‘KGF2’ हा चित्रपट प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला असून, हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात संजय दत्तने ‘अधीरा’ ही भूमिका साकारत आहे.
हेही वाचा :