Bigg Boss 18 : भूमी पेडणेकरची 'गर्लफ्रेंड' बिग बॉस 18 च्या घरात, गंगुबाई काठियावाडीमध्येही केलंय काम
Bigg Boss New Season : 'बधाई दो' चित्रपटातील अभिनेत्री चुम दरांग हिची बिग बॉसमध्ये एन्ट्री होणार आहे.
![Bigg Boss 18 : भूमी पेडणेकरची 'गर्लफ्रेंड' बिग बॉस 18 च्या घरात, गंगुबाई काठियावाडीमध्येही केलंय काम Bigg Boss 18 who is badhaai do actress chum darang who is bhumi pednekar s girlfriend marathi news Bigg Boss 18 : भूमी पेडणेकरची 'गर्लफ्रेंड' बिग बॉस 18 च्या घरात, गंगुबाई काठियावाडीमध्येही केलंय काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/04/563c16c37eae663b0ad7f96d3b38ab441728013637679322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Salman Khan Bigg Boss 18 : सलमान खान बिग बॉस 18 सीझनद्वारे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. बिग बॉस 18 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक येणार हे, जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉस 18 साठी अनेक सेलिब्रिटींची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भूमी पेडणेकरची 'गर्लफ्रेंड' बिग बॉस शोमध्ये एन्ट्री घेणार असल्याची माहिती आहे. 'बधाई दो' चित्रपटातील अभिनेत्री चुम दरांग हिची बिग बॉसमध्ये एन्ट्री होणार आहे. 'बधाई दो' चित्रपटात चुम दरांग भूमी पेडणेकरच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली होती.
बिग बॉस 18 मध्ये दिसणार भूमी पेडणेकरची 'गर्लफ्रेंड'
बधाई दो, गंगुबाई काठियावाडी यासारख्या चित्रपटांमध्ये झलकलेली अभिनेत्री चुम दरांग बिग बॉस 18 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होमार आहे. चुम दरांग हिला शोच्या निर्मात्यांनी संपर्क साधला होता. त्यानंतर तिने बिग बॉसच्या घरात जायचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मॉडेल आणि अभिनेत्री चुम दरांग प्रसिद्धीसाठी बिग बॉस शोमध्ये सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहेत. ती मागील 7 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे, पण तिला हवी तशी ओळख अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे ती बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
गंगुबाई काठियावाडीमध्येही केलंय काम
बिग बॉस तकच्या रिपोर्टनुसार, चुम दरंगला यंदाच्या बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी फायनल करण्यात आले आहे. मात्र, अभिनेत्री किंवा निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. असे असले तरी ही बातमी खरी असेल तर प्रेक्षकांना चुमला शोमध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे. यावेळी शोमध्ये केवळ सेलिब्रिटीच सहभागी होतील आणि प्रभावशाली व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही.
चुम दरांगचा बॉलिवूडमधील आतापर्यंतचा प्रवास
चुम दरांग अभिनेत्री आणि मॉडेल आहे. चुम दरांग भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांच्यासोबत 'बधाई दो' चित्रपटामध्ये झळकली होती, तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातही तिने काम केलं होतं. चुम पाताललोक वेब सीरिजमध्येही झळकली आहे.
View this post on Instagram
Miss Asia World मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
चुम दरांने अनेक ब्युटी पेजंट्समध्ये भाग घेतला आहे. 2014 मध्ये ती नॉर्थ ईस्ट डिवा स्पर्धेची फायनलिस्ट ठरली होती. 2015 मध्ये ती मिस हिमालय स्पर्धेची सेकंड रनर अप होती. 2017 मध्ये चुमने मिस एशिया वर्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss 18 : बिग बॉस 18 मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या नावावर शिक्कामोर्तब; पाहा यादी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)