Pushpa 2 : प्लीज तुमचे पैसे वाया घालवू नका..., 'पुष्पा 2' न पाहण्यासाठी कोकण हार्डेट गर्लनं प्रेक्षकांना केलं आवाहन
Pushpa 2 : बहुचर्चित पुष्पा 2 न पाहण्यासाठी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.
Ankita Prabhu Walawalkar on Pusha 2 : बॉक्स ऑफिसह (Box Office) सगळीकडे सध्या एकाच सिनेमाची चर्चा आहे. अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा 2 (Pusha 2) सिनेमा नुकताच सिनेमागृहांत दाखल झालाय. अवघ्या तीनच दिवसांत जवळपास 300 कोटींचा गल्ला या सिनेमाने जमावला आहे. असं असतानाच कोकण हार्डेट गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar ) हिने मात्र प्रेक्षकांना हा सिनेमा न पाहण्याचं आवाहन केलंय.
अंकिताने तिच्या सोशल मीडियावर हा सिनेमा पाहिल्यानंतर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनयाला 100 पैकी 100 मार्क दिलेत. पण तरीही हा सिनेमा न पाहण्याचं आवाहन अंकिताने प्रेक्षकांना केलंय. इतकच नव्हे तर सिनेमासाठी पैसे खर्च करु नका असंही अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
अंकिताची पोस्ट नेमकी काय?
अंकिताने इन्स्टाग्राम पोस्टवर पुष्पा2 चं पोस्टर शेअर केलंय. यामध्ये तिने म्हटलं की, अभिनय 100 पैकी 100 पण कथा मात्र शून्य.... पुष्पाचा पहिला भाग दुसऱ्या भागापेक्षा खूप चांगला होता. प्लीज तुमचे पैसे वाया घालवू नका... मला असं वाटतं की, मनोरंजन हे एक खूप प्रभावी माध्यम आहे आणि जे सिनेमे प्रेक्षकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पोहचतात ते चांगलेच असायला हवे...
GQ India च्या मते, पुष्पा 2 चे बजेट जवळपास 500 कोटी रुपये आहे. चित्रपटाचे कलेक्शन ज्या प्रकारे वाढत आहे, ते पाहता वीकेंडच्या शेवटी हा चित्रपट आपले बजेट कव्हर करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेता अल्लू अर्जुन ही जोडी 2021 साली प्रदर्शित झालेला पुष्पा पुन्हा एकदा परतला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाला देशभरातील प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. लवकरच, पुष्पाच्या तिसऱ्या भागावरही काम सुरू होईल, ज्याची घोषणा पुष्पा 2 च्या शेवटीच झाली आहे.
ही बातमी वाचा :