Entertainment News Live Updates 9 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'पोन्नियिन सेल्वन'चा टीझर आऊट
'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा आजवरचा सर्वात महागडा सिनेमा असणार आहे.
वैदर्भीय बोलीभाषेतून धडे देणारे कराळे गुरुजी येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी येणार आहेत.
दाक्षिणात्य अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली आहे. त्याला चैन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विक्रमची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन रिलेशनशिपमध्ये? करण जोहरच्या शोमधून मोठा गौप्यस्फोट!
छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या शोमधून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील गुपितं उघड करत असतात. या शोच्या 7व्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघे हजेरी लावणार आहेत. या शोचे प्रोमो देखील प्रचंड चर्चेत आले आहेत. दरम्यान, शोच्या प्रमोशनवेळी करण जोहरने अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या रिलेशशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.
शिंजो आबेंच्या निधनावर अनुपम खेर यांनी व्यक्त केला शोक
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता दिग्गजांकडून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहे.
Thor Love And Thunder : 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'चा धमाका; बॉलिवूड सिनेमांना टाकलं मागे
Thor Love And Thunder Affected Bollywood Films : गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दाक्षिणात्य सिनेमानंतर आता हॉलिवूड सिनेमांनी बॉलिवूड सिनेमांना मागे टाकलं आहे. 'भूल भुलैया 2' या सिनेमाला सोडलं तर सध्या प्रदर्शित झालेले 'जुग जुग जिओ', 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट', 'राष्ट्रीय कवच ओम' सारखे अनेक बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. तर दुसरीकडे 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' धुमाकूळ घालत आहे.
KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; 'असा' असेल बदललेला नियम
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात स्पर्धक जर 1 कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार झाला आणि ते उत्तर चुकलं तर स्पर्धकाला फक्त 3 लाख 20 हजार मिळत असतात. पण 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला फक्त 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे.
View this post on Instagram
Laal Singh Chaddha OTT Release : आमिर-करीनाचा 'लाल सिंह चड्ढा' ओटीटीवर होणार रिलीज
Laal Singh Chaddha OTT Release : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aami Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे.
Koffee With Karan 7 : 'कॉफी विथ करण 7'चा विक्रम; पहिल्याच भागाने केला रेकॉर्ड
Koffee With Karan 7 : सिने-निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचे सहा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता सातव्या सीझनचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या भागाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड केला आहे.
View this post on Instagram
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता' मालिकेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी; निर्मात्यांना मिळाली नवी दयाबेन
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या काही दिनवसांपासून हा शो चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अनेक कलाकारांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री दिशा वकानीनं (Disha Vakani) देखील ही मालिका सोडली. दिशा या मालिकेमध्ये दयाबेन (Dayaben) ही भूमिका साकारत होती. आता दयाबेन ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता लवकरच दिशा वकानी यांना एक अभिनेत्री रिप्लेस करणार आहे.