Ranbir Kapoor, Alia Bhatt : रणबीर की आलिया; कोणाकडे संपत्ती जास्त? जाणून घ्या त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईलबाबत..
आलिया (Alia Bhatt) आणि रणबीर (Ranbir Kapoor) हे 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत.
Ranbir Kapoor, Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर हे 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. जाणून घेऊयात त्यांच्या संपत्तीबाबत...
रणबीरची संपत्ती
आलियापेक्षा रणबीरकडे जास्त संपत्ती आहे. रिपोर्टनुसार रणबीरकडे एकूण 377 कोटींची संपत्ती आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत रणबीरचं नाव येते. चित्रपटांबरोबरच रणबीर हा जाहिरातींमध्ये देखील काम करतो. रिपोर्टनुसार, रणबीर एका जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी पाच कोटी मानधन घेतो. तसेच रणबीरकडे BMW X6, लेक्सस, मर्सडीज-बेन्ज जीएल क्लास, ऑडी आर 8 आणि रेंज रोवर या लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. आर 8 या गाडीची किंमत 2.30 पेक्षा जास्त आहे. मुंबईमधील बांद्रा येथे रणबीरचं घर आहे. या घराची किंमत जवळपास 30 कोटी आहे.
आलियाची संपत्ती
रिपोर्टनुसार आलियाकडे 158 कोटी एवढी एकूण संपत्ती आहे. 2018 साली आलियानं लंडनमध्ये एक घर खरेदी केली. या घराची किंमत 16 कोटी आहे. आलियाचे Eternal Sunshine Production नावाचे एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. आलियाकडे रेंज रोवर इवोक, ऑडी A6, Q5 आणि BMW 7 या लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
- Pathan : कोणी 85 तर कोणी 25 कोटी; पठाण चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं एवढं मानधन
- Bhabiji Ghar Par Hai : एंट्रीआधीच नव्या 'गोरी मेम'ची जादू, आता 'अनिता भाभी'च्या भूमिकेत 'ही' अभिनेत्री
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित
- Heart of Stone : प्रियांका अन् दीपिकानंतर आता आलियाची हॉलिवूड वारी; 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये साकारणार प्रमुख भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha