Heart of Stone : प्रियांका अन् दीपिकानंतर आता आलियाची हॉलिवूड वारी; 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये साकारणार प्रमुख भूमिका
आलिया भट (Alia Bhatt) देखील हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Alia Bhatt : बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमधील (Hollywood) चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) हॉलिवूडमध्ये काम करून परदेशातील प्रेक्षकांची मनं जिंकली. आता लवकरच आलिया भट (Alia Bhatt) देखील हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आलिया ही हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री गल गडोट (Gal Gadot) सोबत स्पाय थ्रिलर चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart of Stone) मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक टॉम हार्पर हे करणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे.
गल गडोट आणि आलियासोबत या चित्रपटात जेमी डॉरनन हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. अभिनेत्री गल गडोटनं काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
आलियाचा सध्या गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. तसेच आलियाचे आरआरआर आणि ब्रम्हास्त्र हे आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटामध्ये देखील आलिया महत्वाची भूमिका साकारणार आहे.
संबंधित बातम्या
- Pathan : कोणी 85 तर कोणी 25 कोटी; पठाण चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं एवढं मानधन
- Bhabiji Ghar Par Hai : एंट्रीआधीच नव्या 'गोरी मेम'ची जादू, आता 'अनिता भाभी'च्या भूमिकेत 'ही' अभिनेत्री
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha