![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pathan : कोणी 85 तर कोणी 25 कोटी; पठाण चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं एवढं मानधन
पठाण या चित्रपटासाठी या चित्रपटामधील कलाकारांनी किती मानधन घेतले असेल? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल.
![Pathan : कोणी 85 तर कोणी 25 कोटी; पठाण चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं एवढं मानधन pathan starcast fees shah rukh khan john abraham deepika padukone john abraham fees for pathan movie Pathan : कोणी 85 तर कोणी 25 कोटी; पठाण चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं एवढं मानधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/25/6e455e0cbb16c2460f4ab49162e45f6c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pathan : अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh khan) ,जॉन अब्राहम (John Abraham) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांची प्रमुख भूमिका असणारा पठाण (Pathan) या चित्रपटाची गेली अनेक दिवस चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. टीझर पाहून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पठाण या चित्रपटासाठी या चित्रपटामधील कलाकारांनी किती मानधन घेतले असेल? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. जाणून घेऊयात कलाकारांच्या मानधनाबाबत...
पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. चित्रपटात शाहरूख खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्टनुसार, शहारूखनं या चित्रपटात काम करण्यासाठी 85 कोटी मानधन घेतलं. जॉन अब्राहमच्या फिटनेस आणि अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या चित्रपटात तो हटके भूमिका साकारणार आहे. चित्रपटात काम करण्यासाठी जॉननं 25 कोटी मानधन घेतले आहे.
दीपिका पादुकोणचा गेहराईंया हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता पठाण चित्रपटात दीपिकाचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दीपिकानं या चित्रपटात काम करण्यासाठी 18 कोटी मानधन घेतलं आहेत.
View this post on Instagram
- संबंधित बातम्या
- Housefull : अखेर थिएटर गजबजलं.. सिने-नाट्यगृहाबाहेर झळकले हाऊसफुल्लचे बोर्ड
- Kitchen Kallakar : आता मनोरंजनाची चव आणखी वाढणार, 'किचन कल्लाकार'च्या मंचावर होणार मनोरंजनाचा डबल तडका
- Bollywood Upcoming Films : 'पठाण', 'टायगर 3' पासून 'जयेशभाई जोरदार'पर्यंत यशराज प्रॉडक्शनचे 'हे' बिग बजेट सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)