राज्यात दहावी-बारावीचा निकाल कधी? पालक आणि विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला
जूनमध्ये MSBSHSE बोर्डाने तसंच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल 15 जुलै ते 20 जुलैपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली होती. आज 15 जुलै असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बारावीच्या निकालाची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education राज्यातलं दहावी-बारावीच्या परीक्षा घेणारं बोर्ड. राज्यात सध्या सर्वाधिक प्रतीक्षा केली जातेय, दहावी-बारावीच्या निकालाची, पण बोर्डाकडून अधिकृतपणे त्याविषयी काहीही सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळेच निकालाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. HSC result date म्हणून अनेकजण गूगलवर सर्च करत आहेत. देशातल्या CBSE आणि ICSE या प्रमुख परीक्षा बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल आज लागणार आहे. तरीही अजून महाराष्ट्र बोर्डाने तारीख जाहीर केलेली नाही.
CBSE 10th Result 2020 | सीबीएसई दहावीचा निकाल आज, इथं पाहता येणार रिझल्ट
साधारणपणे म्हणजे गेल्या वर्षात निकाल लागण्याच्या एक दिवस आधी बोर्डाकडून सर्व संबंधितांना कळवलं जातं. यापूर्वी निकालाची तारीख आधी जाहीर व्हायची, आता मात्र फक्त एक दिवस आधी निकालाची तारीख कळवली जात आहे. त्यामुळे अनेक जण याआधीच्या तारखांवरुन बोर्डाच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा सोशल मीडियात व्हायरल करत आहेत.
जूनमध्ये MSBSHSE बोर्डाने तसंच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल 15 जुलै ते 20 जुलैपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली होती. आज 15 जुलै असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बारावीच्या निकालाची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे.
ऑनलाईन शिक्षण कसे दिले जावे? केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डिजिटल शिक्षणासंबंधी गाईडलाइन्स जारी
देशभरातल्या बहुतेक सर्व राज्यांच्या बोर्डांनी आणि दोन राष्ट्रीय बोर्डांनीही त्यांचे निकाल जाहीर केले आहेत. आज पश्चिम बंगाल आणि सीबीएसईच्या दहावी परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत.
Mahresult.nic.in 2020 HSC result date पाच दिवसांपूर्वी म्हणजे 10 जुलै 2020 रोजी हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै दरम्यान तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होईल, असं स्पष्टपणे सांगितलं होतं.
त्यामुळे निकाल कधी लागणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली असली तरी शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी पाच दिवसांची प्रतीक्षा करावीच लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या हिंगोलीच्या पालकमंत्री ही आहेत.
महाराष्ट्र राज्य बोर्डाचे निकाल http://mahresult.nic.in/ वर पाहायला मिळतात, या साईटवर लॉग ऑन केल्यावर सध्या तिथे 2020 चे निकाल अजून जाहीर झालेले नाहीत, निकाल कधी जाहीर होतील, याची माहिती http://results.gov.in/ या परीक्षांचे निकाल देणाऱ्या पोर्टलवर जाहीर करण्यात येईल, अशा माहितीचा मजकूर आहे.
राज्यात बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान पार पडली. देशात कोरोना लॉकडाऊनच्या आधी बारावीची परीक्षा पूर्ण करणाऱ्या मोजक्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. तरीही लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं संकलन यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे मागच्या वर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. पण यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकालाला उशीर होत आहे.
राज्य बोर्डामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा फक्त एका विषयाचा पेपर कोरोना लॉकडाऊनमुळे रद्द करावा लागला होता. तो पेपर भूगोल या विषयाचा होता.
'त्या' गुणपत्रिकांवर प्रमोटेड कोविड-19 चा शिक्का नसेल; कृषीमंत्री दादा भुसे यांचं पालक आणि विद्यार्थ्यांना आश्वासन
Maharashtra Board HSC Result 2020 यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परीक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत. आता या परीक्षेचा निकाल कधी लागतो याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Maharashtra Board HSC Result | महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल कधी लागणार?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI