'त्या' गुणपत्रिकांवर प्रमोटेड कोविड-19 चा शिक्का नसेल; कृषीमंत्री दादा भुसे यांचं पालक आणि विद्यार्थ्यांना आश्वासन
कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-19 असा उल्लेख केल्याप्रकरणाची कृषीमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांना दिलेली प्रमाणपत्र परत घेऊन नवीन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं आश्वासन पालक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
!['त्या' गुणपत्रिकांवर प्रमोटेड कोविड-19 चा शिक्का नसेल; कृषीमंत्री दादा भुसे यांचं पालक आणि विद्यार्थ्यांना आश्वासन Covid-19 not be mentioned on the mark sheet of agriculture university assure agriculture minister dada bhuse 'त्या' गुणपत्रिकांवर प्रमोटेड कोविड-19 चा शिक्का नसेल; कृषीमंत्री दादा भुसे यांचं पालक आणि विद्यार्थ्यांना आश्वासन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/13054508/dadaji-bhuse.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी : कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-19 असा उल्लेख केल्याप्रकरणाची कृषीमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच राज्य शासनाने असे कोणतेही आदेश दिलेला नसतानाही तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून त्यांची कारवाई करण्याचे महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला निर्देश देण्यात आले आहेत.
अकोला कृषी विद्यापीठा अंतर्गत अमरावती कृषी विद्यालयामधील 247 विद्यार्थ्यांना कोविड-19 असा उल्लेख असलेल्या गुणपत्रिका देण्यात आल्या होत्या. आता याप्रकरणी कृषी मंत्र्यांनी चौकशी आदेश दिले असून विद्यार्थ्यांना दिलेली प्रमाणपत्र परत घेऊन नवीन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं आश्वासन पालक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ : कृषी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर 'प्रमोटेड कोविड-19' शिक्का असल्याचे फोटो व्हायरल
चारही कृषी विद्यापीठांनी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही : कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी केले स्पष्ट
राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील विविध शाखांच्या तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-19 असा शिक्का असणार असल्याची बाब समोर आल्यानंतर या वादाला तोंड फुटले. अनेक विद्यार्थी संघटनांनी याला विरोध दर्शवला. काहींनी तर न्यायालयात जाण्याचे भाष्य केले. तसेच गुणपत्रिकांवर कोविड-19 असा उल्लेख केला जाऊ नये या मागणीचा आग्रह भाजपकडूनही करण्यात येत होता. भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी हा मुद्दा लावून धरला होता. मात्र असा कुठलाही निर्णय कोणत्याही कृषी विद्यापीठाने घेतला नसल्याचं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी स्पष्ट केले आहे. अमरावती येथील ज्या प्राचार्यांनी यावरील प्रतिक्रिया दिली आहे, त्यांना याप्रकरणी जाब विचारला जाणार असल्याचेही परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले. तसेच या वृत्तावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील कुलगुरू ढवण यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर "प्रमोटेड कोविड-19" असा शिक्का देणं ही बाब चुकीची : आशिष शेलार
भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट करत ही बाब अत्यंत चुकीची असल्याचं सांगितलं होतं. आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, 'कृषी विद्यापीठातील गुणपत्रिकेवर "प्रमोटेड कोविड-19" असा शिक्का असल्याचे आता समोर आलेय. ही बाब अत्यंत चुकीची, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. आम्ही सूचना केल्या की सरकारच्या अंगाला सुया टोचतात..विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून आम्ही हेच सांगत होतो एवढे दिवस! "ढ" कारभार सगळा!'
महत्त्वाच्या बातम्या :
बियाणांमध्ये दोष आढळल्यास महाबिजवरही कारवाई करू, कृषिमंत्री दादा भुसे आक्रमक
राज्यातील चारही कृषी विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)