CBSE 10th Result 2020 | सीबीएसई दहावीचा निकाल थोड्याच वेळात, इथं पाहता येणार रिझल्ट
CBSE Class X Result 2020 दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी आता फक्त काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नवी दिल्ली : CBSE Class X Result 2020 दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी आता फक्त काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सीबीएसईचा बारावीचा निकाल 13 जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याविषयी उत्सुकता होती. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे 15 जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करणं अपेक्षित होतं. बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर दहावीच्या निकालाकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. मात्र केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी दहावीच्या निकालाबाबत ट्विटरवरून ही घोषणा केलीय. काल त्यांनी याबाबत ट्वीट करत 15 जुलै रोजी दहावीचा रिझल्ट जाहीर होईल, अशी घोषणा केली.
My dear Children, Parents, and Teachers, the results of class X CBSE board examinations will be announced tomorrow. I wish all the students best of luck.????#StayCalm #StaySafe@cbseindia29
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) July 14, 2020
कसा आणि कुठे पाहाल निकाल
सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी www.cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर दहावीच्या निकाल पाहण्याच्या लिंकवर क्लिक करा.. ही लिंक नव्या टॅबमध्ये ओपन होईल किंवा नवं पेजवर तुम्ही रिडायरेक्ट व्हाल. या नव्या पेजवर तुम्हाला निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, स्कूल नंबर, सेंटर नंबर आणि हॉल तिकीट आयडी भरावा लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल उपलब्ध होईल.
बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही फक्त वेबसाईटवर जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सीबीएसईकडून पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता कमीच आहे. तसंच आयसीएसई किंवी सीबीएसई बारावी प्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका, उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डिजिलॉकरमध्ये अपलोड केलं जाण्याची शक्यता आहे. असे दिले जातात इंटरनल असेसमेंट मार्क्ससीबीएसई बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत प्रत्येक विषयाला 20 गुण इंटरनल असेसमेंट साठी दिले जातात. यात 10 गुण पीरियाडिक टेस्ट (PT), 5 गुण नोटबुक जमा करण्यासाठी आणि 5 गुण सब्जेक्ट इनरिचमेंट अॅक्टिव्हीटीसाठी दिले जातात.
यावर्षी कोरोनामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अनेक विषयांचे पेपर झाले असले तरी उत्तर भारतात, मात्र सर्व पेपर झालेले नाहीत. सीबीएसई परीक्षांचा वाद सर्वोच्च न्यायालयाही पोहोचला होता. सीबीएसई बोर्डाने दोन वेळा परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या, मात्र अनेक राज्यांनी त्या तारखांना परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्याने सीबीएसईने 1 ते 15 जुलै दरम्यान जाहीर केलेल्या परीक्षा रद्द केल्या होत्या. तसंच सीबीएसईकडून न्यायालयात 15 जुलै किंवा त्यापूर्वी दहावी-बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI