एक्स्प्लोर

Vikram Kale on Teachers : शिक्षकांना कुत्रे मोजायला लावता का? विक्रम काळे सभागृहात भडकले, पंकज भोयार यांनी उत्तर देत काळेंना केलं गप्प, सभागृहात नेमकं काय घडलं?

Vikram Kale on Teachers : सरकारकडे इतक्या यंत्रणा आहेत, इतर कर्मचारी आहेत, त्यांना काम नसतं, तरी त्यांना कामाला लावलं जात नाही, शिक्षकांना काम लावलं जातं अशी खंत काळेंनी सभागृहात मांडली.

मुंबई: राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अधिवेशनावेळी राज्यातील अनेक प्रश्नांवरती सभागृहात चर्चा होताना दिसत आहे, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रम काळे (Vikram Kale on Teachers) यांनी सभागृहात शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त लावण्यात येणाऱ्या कामांबाबत प्रश्न मांडत म्हटलं की, राज्यामध्ये सातत्याने शिक्षकांकडे असलेली अशैक्षणिक कामे काढावी, आणि आम्हाला फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम ठेवावं, यासाठी वेळोवेळी अनेक शिक्षक संघटना अनेक शिक्षक लोकप्रतिनिधी देखील वारंवार शासनाकडे पाठपुरावा करतात. इतकंच नव्हे तर मागे झालेल्या राज्यशिक्षक पुरस्कार वितरण समारंभात देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलेलं होतं, यापुढे शिकवण्या शिवाय इतर कोणतेही काम शिक्षकांना लावण्यात येणार नाही. आता तर मात्र कहरच झाला आहे. शिक्षकांना कुत्रे मोजायचं काम दिलेलं आहे. एक प्रकारे मोठा अपमान शिक्षकांचा या ठिकाणी केलेला आहे, हे परिपत्रक काढलेलं आहे, या खात्याचे मंत्री म्हणून काय कारवाई केली जाणार आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी राज्यामध्ये शिक्षकांना आपण आचार्य मानतो, एकीकडे आपण त्यांना मानाचा स्थान देतो आणि दुसरीकडे आपण त्यांना कुत्रा मोजायचं काम लावतो, त्याचबरोबर इतरही अशैक्षणिक कामे त्यांना लावली जातात, निवडणुका देखील त्यांना शिक्षक दिसतो, कोणतीही छोटी-मोठी निवडणूक आली तरी त्यांना शिक्षक दिसतो, मतदार यादी दुरुस्त करायचे असेल तरी शिक्षक दिसतो, स्वच्छता गृह मोजायचे असतील तरी शिक्षक दिसतात, सरकारकडे इतक्या यंत्रणा आहेत इतर कर्मचारी आहेत त्यांना काम नसतं तरी त्यांना कामाला लावला जात नाही, अशी खंत काळेंनी सभागृहात मांडली.(Vikram Kale on Teachers)

मी हे सगळं पोट तिडकीने इथे मांडतो ...

त्याचबरोबर विक्रम काळे पुढे (Vikram Kale on Teachers) आपले प्रश्न सांगताना म्हणाले, आता एका शाळेमध्ये 60 शिक्षक आहेत, तर 45 शिक्षक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कामासाठी घेतले, 15 शिक्षकांवर दोन हजार मुलं कशी सांभाळायची? एका एका वर्गात 50 ते 60 मुलं असतात, कशी शाळा चालवायची, कलेक्टर यांना याबद्दल सांगितले तर ते म्हणतात तुमच्यावर गुन्हा नोंद करू, ते भीती दाखवतात, मी हे सगळं पोट तिडकीने इथे मांडतो आहे, एकीकडून तुम्ही आमच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा करता, तरीसुद्धा हे सगळं काम करून शिक्षक जास्त तास घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो, विद्यार्थी आमचं दैवत आहे, त्यांच्यामुळे शाळा आहे आणि शाळेमुळे आम्ही आहोत, आम्ही हे सगळं कधी विसरत नाही पण यानिमित्ताने माझी आपल्याला विनंती आहे की, मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी आणि आम्हाला बोलवावं आणि याचा सोक्षमोक्ष लावावा. मंत्र्यांनी फक्त उत्तर देऊन वेळ मारू नये, याचा सोक्षमोक्ष लावा, विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या शिवाय शिक्षकांना कोणतेही काम लावणार नाही असं उत्तर ठामपणे उत्तर मंत्री महोदय देतील काय? असा सवालही विक्रम काळे यांनी उपस्थित केला आहे.  

निवडणुकीची कामे शिक्षकांना करणे या ठिकाणी अनिवार्य

यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, सभापती महोदय विक्रम काळे हे सभागृहाचे जेष्ठ सदस्य आहेत, ते अनुभवी आहेत, या अनुभवाचा फायदा ते एखाद्या विषयाचा आपण म्हणतो तसं, राईचा पहाड कसा करायचा अशा प्रकारे ते अनुभवाचा फायदा घेत असतात. त्यांनी सांगितलं की शिक्षकांना कुत्रे मोजण्याचे काम दिले आहे. माझा यावरती आक्षेप आहे. आम्ही देखील स्वीकारतो की शिक्षकांना शिकवण्या व्यतिरिक्त अनेक अशैक्षणिक कामे देण्यात आलेली आहेत. परंतु 28 -8- 2024 च्या शासन निर्णयानुसार आपण शैक्षणिक कामे कोणती आणि अशैक्षणिक कामे कोणती याचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. ज्या ज्या दुसऱ्या विभागाचे अशैक्षणिक कामे आहेत ते आपण सर्व विभागाला सूचना दिले आहेत की आमचे शिक्षक त्या ठिकाणी ही कामे करणार नाहीत. आपण याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. असं असताना देखील मी माहितीसाठी सांगतो बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत कलम 27 अन्वये दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवरणाची कामे, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकीची कामे शिक्षकांना करणे या ठिकाणी अनिवार्य आहे. व त्यामध्ये नमूद केलेलं आहे. असं असताना त्याच्या व्यतिरिक्त अजून बरीचशी कामे त्या ठिकाणी दिलेले आहेत. आपण त्या दोन्ही पोर्टलचा एकत्रिकरण केलं आहे. आता जे वेगवेगळे दोन ॲप होते, त्यांचं एकत्रिकरण केलं आहे. 

श्वान मोजण्याचे काम त्या ठिकाणी दिलेलं नाही

पुढे पंकज भोयर उत्तर देताना म्हणाले की, विक्रम काळेजी आपण त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की, श्वान मोजण्याचे काम शिक्षकांना दिलेले आहे, श्वान मोजण्याचे काम त्या ठिकाणी दिलेलं नाही, आपण पाहतो की अनेक ठिकाणी विपरीत घटना घडते सार्वजनिक ठिकाणी कुत्रे फिरतात, त्यामुळे अनेक घटना घडतात, एक व्यक्ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत सुयोग्य उपाययोजना करणे, त्या परिस्थितीमध्ये जर खाद्यपदार्थ पडले त्याची विल्हेवाट लावणे या अनुषंगाने आपण आपल्या शैक्षणिक प्रिमायसेस मध्ये त्याला व्यवस्थित कुंपण असलं पाहिजे, त्या ठिकाणी खाद्यपदार्थ पडलेले नसले पाहिजेत, याची काळजी घेण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षकांनी दिलेलं आहे, कुत्र मोजण्याचे काम त्या ठिकाणी कुठले दिलेले नाही, त्यामुळे हा आपला प्रश्न मी दूर करतो, दुसऱ्या अजून काही इतर अशैक्षणिक कामे त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे. यासाठी शासन गंभीर आहे. शासनाने येणाऱ्या काळामध्ये किमान एक शनिवार त्यांना फक्त ही कामे करण्यात करता द्यावा का? म्हणजे आठवड्यातला एक दिवस फक्त ते आणि बाकीचे सर्व दिवस शिक्षणाचे काम त्या ठिकाणी करतील किंवा गावागावांमध्ये आपले जे सेतू आहेत, सुविधा केंद्र आहेत, त्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून हे रिपोर्टिंग त्यांना करता येईल का? असा देखील विचार त्या ठिकाणी चालू आहे. याचा नेमका किती आर्थिक भर शासनावरती पडू शकतो हे कॅल्क्युलेशन करून तुमचं मार्गदर्शन तुमचं सहकार्य त्याच्यामध्ये घेण्यात येईल आणि त्यानंतर तो निर्णय अंतिम घेण्यात येईल अशी माहिती देखील राज्यमंत्री पंकज भोयार यांनी दिली आहे.

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
NCP Merger : होय, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवार गटाच्या विलिनीकरणाबाबतचा प्रस्ताव आला होता; एबीपी माझाच्या बातमीला राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा दुजोरा
होय, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवार गटाच्या विलिनीकरणाबाबतचा प्रस्ताव आला होता; 'एबीपी माझा'च्या बातमीला राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा दुजोरा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
Nanded Crime News: नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Embed widget