मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Pradhanmantri Poshan Shakti Nirman Yojana : राज्यातील शाळांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील सुमारे 4,325 शाळांच्या पोषण आहाराचे ऑडिट होणार आहे.

Pradhanmantri Poshan Shakti Nirman Yojana : राज्यातील शाळांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील सुमारे 4,325 शाळांच्या पोषण आहाराचे ऑडिट होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने (Education Departments) या संदर्भात निर्णय जारी केला आहे. राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (Pradhanmantri Poshan Shakti Nirman Yojana)राबवली जाते, या योजनेचे आता ऑडिट केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच टक्के शाळांचे ऑडिट केले जाणार असून यात विद्यार्थ्यांना आहार देण्यातील नियमित्ता, आहाराचे प्रमाण आणि पौष्टिकता, भांड्यांची उपलब्धता इत्यादींसह अनेक बाबी तपासल्या जाणार आहे.
दरम्यान, या कामासाठी साधारणपणे दोन कोटी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. तर ऑडिट झाल्यानंतर संबंधित ऑडिट रिपोर्ट हा शिक्षण संचालकांना सादर करायचा आहे आणि शिक्षण संचालक आणि राज्य आणि केंद्र सरकारला सादर करणे आवश्यक असणार आहे.
Education Department : प्रत्येक जिल्ह्यातील पाच टक्के शाळांचे ऑडिट; बारीक-सारीक गोष्टीची पडताळणी
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना राबवली जाते, या योजनेचे आता ऑडिट केले जाणार आहे. ज्यामध्ये खालील गोष्टींची पडताळणी केली जाणार आहे. सोबतच ऑडिट झाल्यानंतर संबंधित ऑडिट रिपोर्ट हा शिक्षण संचालकांना सादर करायचा आहे. त्यांनतर ऑडिट रिपोर्ट हा शिक्षण संचालक, राज्य आणि केंद्र सरकारला सादर करणे आवश्यक असणार आहे.
-विद्यार्थ्यांना आहार देण्यातील नियमित्ता
-आहाराचे प्रमाण आणि पौष्टिकता
-भांड्यांची उपलब्धता
-स्वयंपाक गृह आणि धान्य साठवण्याची जागा
-आहार तयार करण्याच्या खर्चाची पडताळणी
- पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि हात साबणीने धुण्यासाठी उपलब्धता
- स्वयंपाकी आणि मदतनीस यांचे मानधन
- भोजन तपासणीच्या नोंदवहीची पडताळणी
- विद्यार्थी मदतनीस यांच्या आरोग्याच्या नोंदी
काय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना? (Pradhanmantri Poshan Shakti Nirman Yojana)
गरीब कुटुंबातून आलेल्या मुलांच्या मध्यान्नसाठी केंद्र सरकारनं अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे लोखो गरीब मुलांना फायदा होणार आहे. या योजनेला केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नाव देण्यात आले. केंद्र सरकारच्या मते, देशातील जवळपास 11 लाख कोटींपेक्षा जास्त विद्यार्थांना या योजनेचा लाभ होत आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार एक लाख 71 हजार कोटी रुपये खर्च केल्याचं बोललं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

























