एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

फ्रेशर्सच्या नेमणुकीत पहिल्या सहामाहीत 6 टक्के वाढीची अपेक्षा, ई कॉमर्समध्ये फ्रेशर्सना मोठी संधी तर आयटी क्षेत्रात घट: टीमलीज एडटेकचा अहवाल

Teamlease EdTech Report : टीमलीज एडटेकच्या अहवालानुसार, ई- कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी स्टार्टअप, इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच टेलिकम्युनिकेशन्समध्ये फ्रेशर्सच्या नेमणुकीकडे कल वाढताना दिसत आहे. 

मुंबई : टीमलीज एडटेक (Teamlease EdTech) या भारताच्या आघाडीच्या अध्ययन आणि रोजगारक्षमता उपाययोजना पुरवठादाराने आपला व्यापक करियर आऊटलुक रिपोर्ट एचवाय 1 (जानेवारी- जून 2024) सादर केला असून त्यातून फ्रेशर्ससाठीच्या जॉब मार्केटबाबत काही महत्त्वाच्या बाबी घोषित केल्या आहेत. भारतात फ्रेशर्सच्या नेमणूकीत 2024 मधील पहिल्या सहामाहीत 2023 मधील पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 6 टक्के वाढ झाली आहे (62 टक्के वरून 68 टक्के). त्याचबरोबर नोकरी शोधणाऱ्यांच्या सर्व श्रेणींमध्ये एकूणच फ्रेशर्सच्या नेमणुकीकडे कल 79.3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अशी शाश्वत वाढ म्हणजे फ्रेशर्ससाठी आगामी महिन्यांमध्ये सकारात्मक जॉब मार्केट ठरेल. 

ई कॉमर्समध्ये फ्रेशर्सना मोठी संधी तर आयटी क्षेत्रात घट

या अहवालानुसार फ्रेशर्सच्या नेमणुकीसाठी सर्वांत जास्त नेमणुकीकडे कल असलेल्या तीन उद्योगांमध्ये ई- कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी स्टार्टअप (55टक्के), इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर (53 टक्के) आणि टेलिकम्युनिकेशन्स (50 टक्के) यांचा समावेश आहे. आयटी उद्योगात सीओआर एच2 2023 च्या तुलनेत फ्रेशर्सच्या नेमणुकीत एकूणच घट झाल्याचे (एचवाय 1 2024 मध्ये 42 टक्के तर एचवाय2 2023 मध्ये 49 टक्के) दिसते. त्याचबरोबर मीडिया आणि मनोरंजनासारख्या क्षेत्रांत 3 टक्के घट झाली असून ट्रॅव्हल आणि हॉस्पिटेलिटी क्षेत्रात 4  टक्के वाढ झाली आहे (एचवाय1 2024 विरूद्ध एचवाय2 2023).

बंगळुरू प्रथम क्रमांकावर तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

ग्राफिक डिझायनर, लीगल असोसिएट, केमिकल इंजिनीअर आणि डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यांच्यासारख्या जबाबदाऱ्यांना फ्रेशर्ससाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बंगळुरू हे शहर 69 टक्के नेमणुकीच्या कलाद्वारे आघाडीवर असून त्यापाठोपाठ मुंबई 58 टक्के आणि चेन्नई 51 टक्क्यांवर आहे. दिल्लीमध्ये हा कल 45 टक्के असून एच2 2023 च्या तुलनेत येथे 2 टक्के वाढ झाली आहे. तथापि नवीन टॅलेंटसाठी मागणी सध्या 68 टक्के असून चालू एचवाय1 साठी एचवाय२ च्या तुलनेत (जुलै- डिसेंबर 2023) 3 टक्के थोडीशी वाढ (जानेवारी-जून 2024) झाल्याचे दिसते.

एआयचा फ्रेशर्स जॉब मार्केटवर परिणाम

यावेळी हा अहवाल जनरेटिव्ह एआयच्या फ्रेशर्स जॉब मार्केटवरील प्रभावाबाबत देखील चर्चा करतो. त्यातून पूर्णपणे जागा घेण्याऐवजी नोकऱ्या मानवी-ए आय समन्वयाद्वारे बदलू लागल्‍या आहेत, असे मत मांडले गेले आहे. महत्त्वाचे म्हणजे सातत्यपूर्ण शिक्षण आणि समन्वय या गोष्टींद्वारे फ्रेशर्स जनरेटिव्ह एआयच्या मदतीने तांत्रिक सुधारणेच्या युगात प्रवेश करत आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, तांत्रिक लेखक, कायदेशीर सहाय्यक, मार्केट रिसर्च अॅनालिस्ट आणि ग्राफिक डिझायनर्स यांच्यासारख्या जबाबदाऱ्या बदलतील असे अपेक्षित आहे. 

फ्रेशर्सनी आपल्या कौशल्यात सातत्याने वाढ करून सुसंगत राहून या क्षमतेचा वापर करण्यासाठी जनरेटिव्ह एआयसोबत काम करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. या सर्वेक्षणात भारतभरातील 18 उद्योगांमधील 526 लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांना समाविष्ट केले आहे. ही व्याप्ती 14 भौगोलिक प्रदेशांमध्ये पसरलेली आहे (महानगरे, टायर1 आणि टायर 2) आणि ती नेमणुकीच्या भावनांवर प्रतिबिंबित होते. 

टीमलीज एडटेकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू रूज म्हणाले की, “आतापर्यंत कंपन्यांनी काही काळ जुन्या पद्धतीने विचार केला. त्याचबरोबर जागतिक मंदीच्या कालावधीत नेमणूकांचा वेग कमी झाला. परंतु आमच्या अलीकडच्या अहवालातून भारताच्या प्रगतीत कंपन्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. कंपन्या आपल्या भविष्यातील मार्गाबाबत आत्मविश्वास बाळगून आहेत. ही गोष्ट त्यांच्या नवीन लोकांना नेमून त्यांचा टॅलेंट पूल मजबूत करण्यातील आत्मविश्वासातून दिसते.”

टीमलीज एडटेकच्या सह-संस्थापिका आणि अध्यक्षा नीती शर्मा म्हणाल्या की, “उत्पादन, अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा तसेच बांधकाम आणि रिअल स्टेट असे उद्योग सर्वाधिक सुयोग्य टॅलेंटच्या शोधासाठी एप्रेंटिसशिपला प्राधान्य देत आहेत हे पाहणे खूप गंमतीचा भाग आहे. डिग्री अप्रेंटिसशिपच्या सहाय्याने कंपन्या कौशल्यातील अंतर भरून काढू शकतात, स्पेशलाइज्ड टॅलेंटला पोषण देऊ शकतात आणि उद्योगाच्या अचूक गरजांनुसार आपल्या टॅलेंटला मजबूत करू शकतात. हे अप्रेंटिससाठी महत्त्वाचे ठरते कारण ते एकाच वेळी शिकू आणि कमवू शकतात, शैक्षणिक ज्ञान आणि प्रात्यक्षिक कामाचा अनुभव मिळवू शकतात आणि त्याद्वारे रोजगारक्षम बनू शकतात."

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीतRohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Embed widget