Union Budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
Nirmala Sitharaman budget speech Live : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman budget speech Live) यांनी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर (Budget 2024 LIVE) करण्यास सुरुवात केली.
LIVE
Background
Arthasankalp 2024 LIVE Updates : Nirmala Sitharaman budget speech Live : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman budget speech Live) यांनी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर (Budget 2024 LIVE) करण्यास सुरुवात केली. निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या (Modi govt schemes) योजनांचा देशवासियांना कसा फायदा झाला हे सांगितलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी (Election Budget) होत असलेल्या या बजेटकडे देशवासियांचं लक्ष आहे. यावर्षी सार्वत्रिक निवडणुका (Lok Sabha Elections 2024) होत असल्यामुळे हे अंतरिम बजेट (Interim Budget) असेल. त्यांच्या कारकिर्दीतलं हे सहावं बजेट असेल. मोरारजी देसाईंच्या विक्रमाशी त्या बरोबरी करतील. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करतील. आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्पीय वाटप आणि महसुली अपेक्षांची रूपरेषा त्या आज मांडतील. लोकसभेत बजेट मांडून झाल्यावर राज्यसभेत बजेट मांडलं जाईल. बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण आपण एबीपी माझावर पाहू शकाल.
Interim Budget 2024 LIVE Updates: अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांच्या 'या' मोठ्या घोषणा!
Interim Budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात...
- टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
- 10 वर्ष जुन्या 10 हजार रुपयांपर्यंतचा कर माफ
- राज्यांना 75 हजार कोटी रुपयांचं कर्ज
- जुलैच्या अर्थसंकल्पात भारताचा रोडमॅप विकसित झाला
- 3 कोटी महिला लखपती दीदी बनतील
- 5 वर्षांत 2 कोटी गरिबांसाठी घरं
- पायाभूत सुविधांवर 11 टक्के अधिक खर्च
- वंदे भारतमध्ये 40 हजार रेल्वे बोगी बदलण्यात येणार
- लक्षद्वीपच्या विकासासाठी विशेष योजना
- 3 नवे रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा
Education Budget 2024 : बजेटमध्ये शिक्षणाला काय?
Education Budget 2024 : बजेटमध्ये शिक्षणाला काय?
- देशात 7 नवे IIT, 7 नवे IIM
- नवीन वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार
Youth Budget : बजेटमध्ये तरुणांसाठी काय?
Youth Budget : बजेटमध्ये तरुणांसाठी काय?
- तीन हजार नवे आयटीआय खुले केले
- 54 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळालं.
- आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला मोठं यश
Union budget 2024 LIVE Updates: प्राप्तिकर दरांमध्ये कोणताही बदल नाही : अर्थमंत्री
Union budget 2024 LIVE Updates: प्राप्तिकर दरांमध्ये कोणताही बदल नाही, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर केला.
Union budget 2024 LIVE Updates: टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, आणखी काय म्हणाल्या?
- आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा नाही.
- 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही.
- आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आलीय, परतावा देखील त्वरीत जारी केला जातो
- जीएसटी संकलन दुपटीनं वाढलं
- जीएसटीनं अप्रत्यक्ष कर प्रणाली बदललीय