एक्स्प्लोर

BLOG | कोरोनाला 'नागरिकच' जबाबदार!

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) प्रमुखाने कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला बेजबाबदार नागरिक कारणीभूत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता या वक्तव्यातून बोध घेऊन यापुढे कसे वागले पाहिजे याचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे.

जगात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भारताचा तिसरा क्रमांक आहे. दिवसागणिक कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्या 32 लाखांपेक्षा अधिक झाली आहे, या आजाराने आतापर्यंत 59 हजार 632 नागरिकांचा बळी घेतला आहे. एखाद - दुसऱ्या दिवशी संख्या कमी झाली म्हणून हुरळून जाण्याची गरज नाही. कोरोनाचे आगमन भारतात झाल्यापासून रुग्ण संख्या वाढतच आहे हे वास्तव ध्यानात घेऊन त्याला पायबंद कसा घालता येईल याचाच सातत्याने विचार नागरिक, शासन आणि प्रशासनाने करणे क्रमप्राप्त आहे. हे सांगण्यामागे कारण म्हणजे आपल्या देशातील आरोग्याच्या संशोधनात आणि व्यवस्थापनेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) प्रमुखाने कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला बेजबाबदार नागरिक कारणीभूत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता या वक्तव्यातून बोध घेऊन यापुढे कसे वागले पाहिजे याचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. या वाक्याचा अर्थ सरसकट नागरिक बेजबाबदारीने वागतायत असा होत नाही, परंतु काही असे महाभाग त्यात लहान आणि मोठे असे नाही, काही नागरिक सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवून मोकाटपणे फिरत आहेत. महाराष्ट्रात आजच्या घडीला 7 लाख 03 हजार 823 रुग्ण असून त्यापैकी 5 लाख 14 हजार 790 रुग्ण बरे होऊन घरी गेलं आहेत तर 1 लाख 65 हजार 921 रुग्ण सध्या राज्यात उपचार घेत आहेत. तर 22 हजार 729 रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. देशांची आणि राज्याची आरोग्य यंत्रणा दिवस रात्र काम करीत असून रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून दररोज मेहनत घेत आहेत. या वैश्विक महामारीच्या काळात प्रत्येक जण आपआपले काम इमाने इतबारे करीत आहेत. गेल्या सहा महिन्यात कोणती काळजी घेणे अपेक्षित आहे याबाबत सुरक्षिततेचे सर्व नियम नागरिकांना माहित झालेले आहेत. आजाराचा संसर्ग वाढत जाणे आणि रुग्णबाधित रुग्ण बरे होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे. रुग्णाबाधित रुग्ण बरे होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र त्याचवेळी संसर्गाचा फैलाव होऊन नवीन रुग्णाचे निदान होत राहणं ही चिंतेची बाब आहे. मंगळवारी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले की, तरुणांमुळे किंवा वयोवृद्धमुळे नाही, तर केवळ बेजबाबदार आणि काळजी न घेणाऱ्या नागरिकांमुळे देशात कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. हे बेजबाबदार नागरिक मास्क लावत नाही, त्याचप्रमाणे सोशल डिस्टंसिंग पालन व्यवस्तिथ करत नाहीत. त्यामुळे संसर्गचा प्रसार होत आहे असे स्पष्ट केले. याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, "सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केल्यामुळे बऱ्यापैकी कोरोनाच्या विषाणूचा प्रसार आटोक्यात होऊ शकतो. संपूर्ण जगात या नियमाचे पालन करून त्याचा फायदा होत असल्याचे आपण सगळ्यांनीच पाहिले आहे. आजही अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा रस्त्यावर बघतो तेव्हा नागरिक अनेकवेळा मास्क न लावताच हिंडत असतात, सोशल डिस्टंन्सिंगचा तर फज्जा उडालेला अनेकवेळा पाहायला मिळतो. या कोरोनाच्या संकटापासून दूर राहायचे असेल तर आपल्याला आखून दिलेल्या नियमांचे पालन केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे ऐकायला आश्चर्य वाटेल वाटेल. परंतु, अजूनही काही लोकांपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय कोणते याची माहितीच पोहचलेली नाही. माझ्या क्लिनिक मध्ये आजही अनेक लोकांना मला मास्क लावायला सांगावे लागते. आमच्याकडे राज्याच्या काही भागातून अशाही तक्रारी येत आहे की ज्यावेळी डॉक्टर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मास्क लावायला सांगतात तेव्हा ते डॉक्टरांशी हुज्जत घालतात. सोशल डिस्टंन्सिंग पाळायचं म्हणून काही रुग्णांना वेळेचे बंधन घालून दिले जातात. तेही त्या रुग्णांना पाळायचं नसतं. त्यामुळे डॉ. बलराम भार्गव जे म्हणतायत ते बरोबरच आहे. काही बेजबाबदार लोकांमुळे संसर्ग पसरतोय." सध्या सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. काही लोक नियमाचे पालन अतिशय काटेकोरपणे करत आहेत तर काही लोकांना कोरोनासारखा आजार आपल्याकडे होता हेच विसरून गेलेलं पाहायला मिळत आहे. अशा प्रवुत्तीमुळे खूप धोके संभवतात. त्यामुळे कोणीही फाजील आत्मविश्वास न बाळगता नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच सध्या देशातील विविध भागात सिरो सर्वेक्षणाचे आयोजन केले जात आहे, त्यामुळे किती लोकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत त्याची तपासणी या सर्वेक्षणद्वारे करण्यात येणार आहे. यामुळे संसर्गाच्या संपर्कात असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण समजून घेण्यासाठी, देखरेखीसाठी तसेच विषाणूचं संक्रमण किती प्रमाणात होत आहे, याकरिता अँटीबॉडीज चाचणी महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक क्रियाशील होते. या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) चाचणी पॉजिटीव्ह येते, त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत जितके सर्वेक्षण झाले आहेत त्यामध्ये अजूनही आपल्याकडे अपेक्षित अशा प्रमाणात अँटीबॉडीज नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या नाहीत. त्यामुळे लोकांनी काळजी घेत स्वतःच्या सुरक्षेकडे पहिला पाहिजे. यापूर्वीच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने देशात कोणत्याही प्रकारचा समूह संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारताची लोकसंख्या आणि या विषाणूचं वागणं पाहता समूह संसर्ग झाला नाही यामध्ये खरोखरच यश आहे. कारण हा आजार संसर्गजन्य आहे. बाधीत रुग्ण हा आजार पसरवत असतात, मुद्दाम नव्हे परंतु अनावधाने हा सर्व प्रकार घडत असतो. या सर्व प्रकाराला आळा घालायचा असेल तर लोकांनी सुरक्षिततेचे नियम कठोर पद्धतीने पाळले पाहीजे. लॉकडाउन मधील शिथिलतेचा भलताच अर्थ घेत रस्त्यांचा ताबा नागरिकांनी घेतला आहे. या गर्दीवर नियंत्रण नसल्यामुळे अनेक ठिकाणी सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवले जात आहे. चांगल्या भावनेने दिलेल्या शिथिलतेचा गैरवापर होत असेल तर, 'पुनश्च हरिओम' या संकल्पनेवरच गदा येणायची शक्यता नाकारता येत नाही. अनलॉक झाल्यानंतर अनेक वैद्यकीय तज्ञांनी रुग्णसंख्या वाढू शकते असे भाकीत वर्तविले होते आणि झालंही तसेच, परंतु या सगळ्या प्रकारात शेवटी नागरिकच आजारी पडत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यामध्ये बऱ्यापैकी रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. मात्र, थोड्या प्रमाणात का होईना काही लोक मृत्युमुखी पडत आहेत. हे मृत्यू थांबविण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. लक्षणे दिसताच ती न लपविता तात्काळ दवाखान्यात किंवा रुग्णलयात जाऊन तात्काळ उपचार घेतल्यास अनेक वयोवृद्ध रुग्ण बरे झाल्याचे आपल्याकडे उदाहरणं आहेत. कोरोनाचे संकट अजूनही हवे तसे टळलेले नाही. रोज रुग्णसंख्या वाढत आहे हे वास्तव आपण वेळीच ओळखले पाहिजे. अजूनही राज्याच्या अनेक ठिकाणी नवीन जंबो हॉस्पिटलची उभारणी केली जात आहे. त्याचप्रमाणे आजही कंत्राटी पद्धतीवर अधिक मनुष्यबळ निर्माण व्हावे याकरिता सर्वच महापालिका प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्राला मदत यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे या कोरोनाच्या प्रसाराचं कारण नागरिकांनी व्हायचं की, हा कोरोना रोखण्याकरिता प्रशासनाला बळ द्यायचं याचा आता प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे. मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंग हे आपल्या हिताकरिता आहे, यामध्ये कुणाचा काहीही फायदा नाही. त्यामुळे आता कोरोना पासूनच दूर राहण्याच्या सुरक्षिततेचा 'बॉल' नागरिकांच्या कोर्टात आहे याच विचार त्या प्रत्येक बेजबाबदारीने वागणाऱ्या नागरिकाने केला पाहिजे. संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget