एक्स्प्लोर
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या धाकट्या मुलाचा लग्नसोहळा आज पार पडत आहे.
Jay pawar marriage ajit pawar dance
1/9

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या धाकट्या मुलाचा लग्नसोहळा आज पार पडत आहे.
2/9

जय पवार यांचं लग्न बहरीनमध्ये पार पडत असून काही महिन्यांपूर्वीच जय आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला होता, आता यांचा विवाह सोहळा 4, 5 आणि 7 डिसेंबर रोजी बहरीनमध्ये होत आहे.
3/9

बहरीनमधील या शाही लग्नसोहळ्यासाठी पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार बहरीनला लग्नाला गेले नाहीत.
4/9

जय पवार यांच्या लग्नासाठी आमदार रोहित पवार आणि नुकतेच विवाह झालेले युगेंद्र पवार यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. खासदार सुप्रिया सुळेंनी या लग्नसोहळ्याच्या वरातीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
5/9

खासदार शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे लग्नसोहळ्यासाठी गेल्या नाहीत. मात्र, सुप्रिया सुळेंनी जय की बारात.. असे म्हणत या लग्नाच्या वरातीचे खास फोटो शेअर केले आहेत
6/9

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार पांढऱ्या रंगाच्या शेरवानी ड्रेसमध्ये डोळ्यावर गॉगल अन् फेटा बांधून नाचताना दिसून येतात. अजित दादांचा डान्स सध्या व्हायरल होत आहे.
7/9

लेकाच्या लग्नाच सैराट चित्रटातील झिंगाट गाण्यावर नाचताना बापमाणूस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पाहून अनेकांना तो व्हिडिओ चांगलाच आवडलाय.
8/9

जय यांच्या वरातीत अजित पवारांसह आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हेही दिसून येत आहेत. रोहित पवार यांनीही पांढऱ्या रंगाचा शेरवानी आणि डोळ्यावर गॉगल घातल्याचं दिसून येतं.
9/9

दरम्यान, या लग्नसोहळ्यातील हळदीचेही फोटो समोर आले असून पवार आणि पाटील कुटुंबीयांसह नातलगांच्या चेहऱ्यावरील लग्नाचा आनंदोत्सव लपत नाही
Published at : 05 Dec 2025 08:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























