हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्यातील सुपरफूट म्हणून चाकवत या पालेभाजीकडे पाहिलं जातं. लहान दिसणाऱ्या हिरव्या पत्त्यांचे अमिनो अॅसिड, फायबर आणि व्हिटामिनचा खजिना आहे

हिवाळ्यातील थंडीचा (Winter) ऋतू आपल्यासोबत उत्तम स्वास्थ टीप्स आणि चमचमीत, गरमागरम पदार्थांची मेजवानी घेऊन येतो. या ऋतूमध्ये बाजारात हिरव्यागार पालेभाज्यांची रेलचेल पाहायला मिळते. गरगट्टा, पालक, चुका, मेथी यांसह विविध पालेभाज्यांनी भाजीमंडई फुलून गेलेली असते. पालक, चुका, मेथीसह आणखी एक पालेभाजी चाकवत म्हणजे उत्तम आरोग्यासाठी लाभदायी अन् चवीने खावी अशी भाजी. आयुर्वेद तज्ज्ञ आणि पतंजलीचे (Patanjali) आचार्य बालकृष्ण यांनी हिवाळ्यात चाकवत खाण्याचे फायदे सांगितले आहे. चाकवत भाजीचे हे आरोग्यदायी फायदे लक्षात घेऊन तुम्ही देखील तुमच्या डाएट प्लॅनमध्ये आणि हिवाळ्यातील आहारामध्ये या भाजीचा समावेश कराल.
हिवाळ्यातील सुपरफूट म्हणून चाकवत या पालेभाजीकडे पाहिलं जातं. लहान दिसणाऱ्या हिरव्या पत्त्यांचे अमिनो अॅसिड, फायबर आणि व्हिटामिनचा खजिना आहे. त्यामध्ये, व्हिटामीन ए, बी आणि सी भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यासह, या भाजीत आयरन, पोटॅशियम, कॅल्शियस आणि फॉस्फरस यांच्यासारख्या आवश्यक मिनरल्सचाही भरणा आहे. त्यामुळे, भारतातील किचनमध्ये, स्वयंपाकघरात थंडीच्या दिवसांत या भाजीला प्राधान्याने स्थान असते.
आयुर्वेदाच्या नजरेतून चाकवत भाजी
आचार्य बालकृष्ण यांच्या मतानुसार, बथुआ ही केवळ एक भाजी नसून औषधी वनस्पतीच आहे. शरिरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही आजारांना दूर करुन संतुलन राखण्याचं काम करते. आयुर्वेदात या भाजीला पोट साफ आणि पचन यंत्रणेसाठी अमृत मानलं जातं.
किडनी आणि लिव्हरसाठी वरदान
या भाजीचा सर्वाधिक फायदा आपल्या शरिरातील फिल्टर म्हणजेच किडनी आणि लिव्हरला मिळतो. ही भाजी लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करते, त्यामुळे शरिरातील विषारी तत्व बाहेर फेकले जातात. किडीनी संदर्भातील आजारावर देखील ही भाजी गुणकारी उपाय आणि औषधी वनस्पतीच म्हणता येईल. या भाजीचे नियमित सेवन रक्त शुद्धीकरणास पोषक आहे. त्यामुळे, आपल्या त्वचेवर याचा थेट परिणाम होतो. चेहऱ्यावरील डाग आणि फोड नाहीसे होतात, चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येते.
पचनसंस्था आणि हाडांना बळकटी
ज्या लोकांना पोटाचे विकार आहेत, त्यांच्यासाठी ही भाजी रामबाण औषध आहे. यामधील फायबर आणि पाण्याचे प्रमाण तुमचे पोट साफ, स्वच्छ ठेवण्यास मदत करते. तसेच, यातील व्हिटामीन सी आणि कॅल्शियम हाडांना बळकटी देतात. यामध्ये अँटी इम्प्लेंटरी गुणही आहेत, ज्यामुळे शरीरावरील सूज आणि जखमा लवकर बऱ्या करण्यास मदत करतात. डोळ्यांची दृष्टी उत्तम ठेवण्यासाठीही ही पालेभाजी गुणकारी ठरते. जे लोक आपला जास्त वेळ स्क्रीनवर देतात, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे.
चाकवत भाजी कशी खावी?
ही पालेभाजी तुम्ही विविध प्रकारे खाऊ शकता. या भाजीचा ज्यूस करुन उपाशीपोटी पिल्यास अत्यंत फायदेशीर आणि शरिराला गुणकारी आहे. तसेच, दाळीत शिजवूनही तुम्ही ही पालेभाजी खाऊ शकता. तर, या भाजीचे पराठे म्हणजेच धपाटे बनवूनही तुम्ही अगदी चवीने ह्या भाजीचा स्वाद घेऊ शकता.
हेही वाचा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























