Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली (Delhi) विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे. इंडिगो विमानाचे (Airport) बुकींग असलेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. इंडिगोच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
या प्रकरणाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल घेतली आहे.
परिस्थिती पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु
इंडिगोच्या सेवेत झालेलेल्या अडचणींमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. DGCA च्या FDTL आदेशांना तत्काळ स्थगिती देण्यात आली असून, प्रवासी हित लक्षात घेऊन आणि विमान सुरक्षेत कोणतीही तडजोड न करता हे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयात 24×7 नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून तेथून परिस्थितीवर देखरेख ठेवली जात आहे. केंद्र सरकारने या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार ही परिस्थिती पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहे. आम्हाला विश्वास आहे की पुढील एक-दोन दिवसांत विमानसेवा स्थिर होतील आणि तीन दिवसांत पूर्णपणे सामान्य होतील असे मोहोळ म्हणाले.























