Shani Nakshatra Gochar 2025 : वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर शनीचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, शनी करणार इच्छापूर्ती
Shani Nakshatra Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज वसंत पंचमीच्या दिवशी शनीने सकाळी 8 वाजून 51 मिनिटांनी पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश केला आहे.

Shani Nakshatra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Shani Dev) ठराविक अंकराच्या कालावधीने राशी परिवर्तन करतो. शनीचं एका राशीच्या नक्षत्रात जवळपास 1 वर्ष राहतो. तर, पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी शनीला तब्बल 27 वर्षांचा कालावधी लागतो. शनीच्या (Lord Shani) नक्षत्र परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, आज वसंत पंचमीच्या दिवशी शनीने सकाळी 8 वाजून 51 मिनिटांनी पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश केला आहे. शनी गुरुच्या नक्षत्रात राहून काही राशींना चांगला लाभ देणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनीचं गुरुच्या राशीत प्रवेश करणं अनुकूल ठरणार आहे. पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करुन शनी या राशीच्या अकराव्या चरणात असणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला धनलाभ मिळेल. या कालावधीत तुमचं वाहन घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तसेच, जुन्या मित्रांशी तुमच्या भेटीगाठी वाढतील. अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. त्यामुळे तुम्ही खुश असाल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात तुम्ही योजलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला अपार धनलाभ मिळेल. त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाला चांगली गती मिळेल. समाजात चांगला मान-सन्मान वाढलेला दिसेल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर, तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. शनीची कृपादृष्टी तुमच्यावर असेल त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करुन शनी लग्न चरणात असणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. तुमच्या करिअरला चांगली गती मिळेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. परदेशात जाण्याची संधीदेखील तुमच्यासमोर चालून येईल. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; मिथुनसह 'या' 5 राशींना मिळणार बक्कळ पैसा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
