Shadashtak Yog 2025 : बुध-मंगळ ग्रहामुळे जुळून येणार 'षडाष्टक योग'; 8 फेब्रुवारीपासून 'या' राशींचे सोन्याचे दिवस होणार सुरु
Shadashtak Yog 2025 : मंगळ ग्रह आणि बुध ग्रह 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 42 मिनिटांनी स्थित होणार आहेत. हे ग्रह एकमेकांच्या 150 डिग्रीवर असणार आहे.

Shadashtak Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. त्यानुसार, मंगळ ग्रह आणि बुध ग्रह 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 42 मिनिटांनी स्थित होणार आहेत. हे ग्रह एकमेकांच्या 150 डिग्रीवर असणार आहे. त्यामुळे षडाष्टक योग निर्माण होणार आहे. या काळात काही राशींना बंपर लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, जर या काळात तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगली नोकरीची संधी मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होईल. या काळात तुमची लाईफस्टाईल बदलण्याची गरज आहे. तसेच, मित्रांचा तुम्हाला चांगला सहवास लाभेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य बुधाचा षडाष्टक योग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना भाग्याची चांगली साथ मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळालेला दिसेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर चांगली कृपा असणार आहे. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, अनेक काळापासून तुमचे रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, कार्यक्षेत्रात तुमचा विकास झालेला दिसेल. तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायात तुमचा चांगला विस्तार झालेला दिसेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Asta 2025 : कर्मफळदाता शनीचा होतोय अस्त; 28 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशी ठरतील लकी, शनीची असणार कृपादृष्टी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
