Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या राजकीय मनोमिलनाच्या घोषणेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना, त्या दोघांना कौटुंबिक सोहळ्यात रमलेलं पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना लाभली. निमित्त होतं मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ. राहुल बोरुडे यांच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत सोहळ्याचं. मुंबईतल्या वेलिंग्टन क्लबच्या हिरवळीवर आज या स्वागत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही सहकुटुंब उपस्थित होते. त्यामुळं ठाकरे कुटुंबीय आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना एकत्र आणणारा हा सोहळा ठरला. एकीकडे उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या गप्पा रंगल्या होत्या. त्याचवेळी आदित्य ठाकरे कधी अमित ठाकरे यांच्यासोबत गप्पांमध्ये, तर कधी अमित यांचे चिरंजीव कियानशी खेळण्यात दंग दिसले. रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यामध्येही गप्पा सुरु होत्या.























