एक्स्प्लोर
Ghatkopar hoarding collapse :घाटकोपर पेट्रोल पंपावर महाकाय बॅनर कोसळला, मृतांचा आकडा 14 वर:ABP Majha
काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातात मृतांचा आकडा १४वर गेला आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात १३ तर सायन रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली आहे.
४३ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७४ जणांना वाचवण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















