एक्स्प्लोर

Sanjay Gandhi National Park : वनसंरक्षकांच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन, मनमानी कारभाराचा आरोप

Sanjay Gandhi National Park: आदिवासी कुटुंबांकडे घरांचे पुरावे आणि कागदपत्रे असतानाही त्यांच्या घरांवर तोडक कारवाई करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. 

Sanjay Gandhi National Park : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलन छेडले आहे. उद्यानालगत असलेल्या अभिनव नगर या उचभ्रू वस्तीत नागरिकांनी एकत्र येत आपल्या नाराजीचा तीव्र स्वर व्यक्त केला. आंदोलकांचा आरोप आहे की, वनसंरक्षकांच्या आदेशानुसार त्यांच्या जागेत सुमारे 2250 चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या मुद्द्यावरून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी झालेल्या आंदोलनात पालिकेचे नगरसेवक राज सुर्वे देखील सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांकडे मागणी

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

आदिवासी घरांवर कारवाईचा आरोप

स्थानिक आदिवासी बांधवांच्या मते, अनिता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून परिसरात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांकडे घरांचे पुरावे आणि कागदपत्रे असतानाही त्यांच्या घरांवर तोडक कारवाई करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या कारवाईमुळे काही दिवसांपूर्वी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि दगडफेकीची घटना देखील घडली होती.

स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम

उद्यान परिसरात पर्यटकांना सेवा देत अनेक वर्षांपासून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिकांच्या वाहनांवरही निर्बंध घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम झाला असून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

अधिकाऱ्यांमध्येही असंतोष

आंदोलकांच्या मते, अनिता पाटील यांच्या कारभारामुळे उद्यानातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. काहींनी इतर विभागात बदली करून घेतली, तर काहींनी नोकरी सोडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget