एक्स्प्लोर

Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात

Stock Market Crash : गेल्या दहा दिवसांपासून अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये जोरदार युद्ध सुरू असून त्याचा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचं दिसून येत आहे.

Stock Market News Marathi : इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून येतंय. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच बाजारात मोठी घसरण झाली असून एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 8.49 लाख कोटी रुपये पाण्यात गेले. दिवसाअखेर सेन्सेक्स 1,352.74 अंकांनी म्हणजे 1.71 टक्क्यांनी घसरून 77,566.16 वर बंद झाला. तर निफ्टी 422.40 अंकांनी म्हणजे 1.73 टक्क्यांनी घसरून 24,028.05 वर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पश्चिम आशियात वाढलेला भू-राजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

जागतिक घडामोडींचा परिणाम

इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक बाजारातून मिळालेले नकारात्मक संकेत आणि रुपयाने गाठलेला नवा नीचांक यामुळेही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. त्यामुळे बाजारात सर्वत्र विक्रीचा जोर दिसून आला. मात्र शेवटच्या तासात खालच्या स्तरांवर काही खरेदी झाल्याने बाजारात थोडीशी सुधारणा झाली.

सर्व सेक्टरमध्ये घसरण

सोमवारी जवळपास सर्वच सेक्टोरल निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो, कॅपिटल गुड्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, मेटल, पीएसयू बँक, ऑइल अँड गॅस आणि प्रायव्हेट बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये 2 ते 4 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. याशिवाय निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही सुमारे 2 टक्क्यांनी घसरले.

गुंतवणूकदारांचे 8.49 लाख कोटींचे नुकसान

बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 441.19 लाख कोटी रुपयांवर आले. याआधीच्या व्यवहार दिवशी हे 449.68 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 8.49 लाख कोटींची घट झाली.

सेन्सेक्समधील टॉप घसरलेले शेअर्स

सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये:

  • अल्ट्राटेक सिमेंट  – 5.23% घसरण
  • मारुती सुझुकी – सुमारे 4% घसरण
  • महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) – 4% पेक्षा जास्त घसरण
  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) – सुमारे 4% घसरण
  • इंडिगो – सुमारे 3.8% घसरण

या शेअर्समध्ये दिसली तेजी

घसरत्या बाजारातही काही शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

तेजीत बंद झालेले प्रमुख शेअर्स:

  • रिलायन्स इंडस्ट्रीज – 1.37% वाढ
  • सन फार्मा
  • इन्फोसिस
  • टेक महिंद्रा
  • एचसीएल टेक

या शेअर्समध्ये 0.13% ते 0.48% पर्यंत वाढझाली.

4,536 शेअर्समध्ये व्यवहार

सोमवारी बीएसईवर एकूण 4,536 शेअर्समध्ये व्यवहार झाला. त्यापैकी 972 शेअर्स वाढीसह बंद झाले. 3,379 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर 185 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. याशिवाय 72 शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर 875 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर आले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! चांदी खरेदी करायचीय? 10 पैकी 3 लोकांची फसवणूक, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
सावधान! चांदी खरेदी करायचीय? 10 पैकी 3 लोकांची फसवणूक, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
संकटात दिलासादायक बातमी! 53 लाख LPG सिलेंडर वितरीत, पुरवठा साखळी होणार सुरळीत
संकटात दिलासादायक बातमी! 53 लाख LPG सिलेंडर वितरीत, पुरवठा साखळी होणार सुरळीत
LIC च्या या दोन योजनेत गुंतवणूक करा, आयुष्यभर उत्पन्न मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती  
LIC च्या या दोन योजनेत गुंतवणूक करा, आयुष्यभर उत्पन्न मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती  
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी तामिळनाडूत मोठा अपघात, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आत्तापर्यंत 16 महिलांसह 23 जणांचा मृत्यू 
धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी तामिळनाडूत मोठा अपघात, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आत्तापर्यंत 16 महिलांसह 23 जणांचा मृत्यू 
Embed widget