Chembur Thackeray vs shinde : शाखेच्या वादावर शिंदे आणि ठाकरे गटाची सामंजस्याची भूमिका
मुंबईत पुन्हा एकदा शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांच्या समोर आले होते. मात्र पहिल्यांदाच या दोन गटांनी सामंजस्याची भूमिका घेऊन तोडगा काढला. चेंबूरच्या पांजरपोळ इथल्या शिवसेना १४६ क्रमांकच्या शाखेवरू वाद पेटला. ही शाखा माजी आमदार तुकाराम काते यांच्या ताब्यात होती. मात्र ते शिंदे गटात गेल्यावर या शाखेला ठाकरे गटाने टाळं लावलं. अनेक दिवस ही शाखा बंद होती. मात्र शिंदे गटाच्या वतीने ही शाखा दुरुस्त करण्याचा प्रयत्न होताच प्रमोद शिंदे आणि शिवसैनिक तिथे पोहचले. यामुळे वाद निर्माण झाला मोठा पोलिस फौजफाटा इथे आला. अखेर या शाखेचे आता दोन भाग केले जाणार आहे. अर्धी शाखा शिंदे तर आर्धी शाखा ठाकरे गट वापरणार आहेत.






















