एक्स्प्लोर

Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 

Gold Rate Today : अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळं सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु होती. आज त्याला ब्रेक लागला आहे. 

नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळं सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु होती. आज सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. 5 मार्चला 24 कॅरेट सोन्याचे दर 2698 रुपयांनी कमी होऊन 159850 रुपयांवर आले आहेत. तर, सराफा बाजारात सोने उच्चांकाच्या तुलनेत 16271 रुपये स्वस्त आहे. सोन्याचा दर 176121 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जीएसटीसह सोन्याचा दर 164645 रुपये आहे. 

आयबीजेएनं जारी केलेल्या दरांनुसार 22 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर 150815 रुपये तोळा आहे. तर, 18 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर 123484 रुपये आहे. आयबीजेएकडून दिवसातून दोन वेळा सोन्यचा दर जाहीर केला जातो.  

आयबीजेएनं दरात घसरण झाल्याचं सांगितलं असलं तरी प्रत्यक्ष सराफा बाजारात बुलियन्स को ईनच्या अपडेटनुसार नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 240 रुपयांची वाढ होऊन 161770 रुपये दर झाला आहे. मुंबईत 230 रुपयांची वाढ होऊन सोनं  162040 रुपये, कोलकाता येथे 230 रुपयांची वाढ होऊन सोनं 161830 रुपये, चेन्नईत 240 रुपयांची वाढ होऊन सोनं 162520 रुपये तर लखनौ मध्ये सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ होऊन 162100  रुपये प्रति 10 ग्रॅम दर आहे. 

चांदीच्या दरात घसरण

सोन्याच्या दरातील घसरणीप्रमाणं चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. आयबीजेएनं जारी केलेल्या दरांनुसार चांदीचे दर 13547 रुपयांनी कमी झाले आहेत.जीएसटीशिवाय चांदीचा दर 257800 रुपये किलो आहे. तर, जीएसटीसह चांदीचा एक किलोचा दर 2.65 लाख इतका आहे. 29 जानेवारी 2026 ला सराफा बाजारात चांदीचा दर 385933 रुपयांवर पोहोचला होता, त्या तुलनेत सध्या चांदी 128133 रुपये स्वस्त आहे. 

चांदीचे नवी दिल्ली, मुंबईतील दर

बुलियन्स को ईन च्या दरानुसार दिल्लीतील चांदीचा दर 264190 रुपये किलो आहे. मुंबईत 264650 रुपये, कोलकाता येथे 264300 रुपये, पाटणा येथे 264510 रुपये, जयपूरमध्ये 264610 रुपये तर लखनऊमध्ये चांदीचा दर 265290 रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरांवर होत असतो. सोने आणि चांदीचे दर गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या सुरु असलेल्या अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं देखील सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु होती. गेल्या वर्षभरात चांदीचा औद्योगिक क्षेत्रातील वापर वाढल्यानं चांदीचे दर वाढले आहेत. जागतिक आर्थिक अनिश्चितता, भूराजनैतिक तणाव या काळात गुंतवणूकदार सर्वसाधारणपणे भांडवली बाजारातील गुंतवणूक कमी करतात. भांडवली बाजारातील गुंतवणुकीऐवजी सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जातं. परिणामी सोन्याचे दर वाढल्याचं दिसून येतं.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
RBI चा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget