बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक
बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 17 दुचाकींसह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे.
Beed Crime News : बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 17 दुचाकींसह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी ही एक कारवाई असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.
चोरीच्या दुचाकींचे स्पेअर पार्ट बदलून मॉडीफाय करून बाजारात विक्री केल्या जात होत्या
बीड जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गेवराई परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकींचा तपास करताना पोलिसांनी नेकनूर परिसरातील एका गोडाऊनवर धाड टाकली. या ठिकाणी चोरीच्या दुचाकींचे स्पेअर पार्ट बदलून मॉडीफाय करून बाजारात विक्री केल्या जात होत्या. या कारवाईत दोन आयशर टेम्पो भरून 17 दुचाकी आणि साहित्य असा 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या सर्वात मोठ्या कारवाईंपैकी ही एक कारवाई असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात लहान मुलांची चोरी करणारे टोळी सक्रिय असल्याचा संशय होता. या प्रकरणी पोलीस तपासात अखेर सत्य समोर आले आहे. या प्रकरणी चार महिला पोलिसांच्या ताब्यात आल्या आहेत. तपासनंतर महिलांची सुटका करण्यात आली आहे. सिडकोच्या लेखानगर परिसरात अफवांनी खळबळ उडाली होती.
गोवऱ्या विक्रीसाठी आलेल्या चार महिलांना मुलं चोरणारी टोळी समजून नागरिकांनी पकडले
होळी धुलीवंदन सणांसाठी लागणाऱ्या गोवऱ्या विक्रीसाठी आलेल्या चार महिलांना मुलं चोरणारी टोळी समजून नागरिकांनी पकडल्याची घटना नाशिक शहरातील लेखा नगर येथे घडली होती. सदर घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन या महिलांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आमच्या उदरनिर्वाहासाठी दरवर्षी होळी सणा निमित्ताने गोवऱ्या - लाकडं विक्री करत असतो. आमच्याजवळ जी मुले आहेत ती देखील आमचीच असल्याचं सांगितलं. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांनी सांगितलेल्या नाशिक रोड ठिकाणी घेऊन गेल्यानंतर विचारपूस केली असता येथील दुकानदार भाजी विक्रेते यांनी देखील या महिला व्यावसायिकच असल्याचा सांगितलं. सदर महिला या आपल्या व्यवसायासाठी या ठिकाणी आल्या होत्या. त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असंही यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आल आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत प्रकरणाची सखोल माहिती घेऊन प्रतिक्रिया दिली.
महत्त्वाच्या बातम्या





















