एक्स्प्लोर

Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 

Share Market: भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 900 अंकांची वाढ झाली. यामुळं सेन्सेक्सनं 80 हजारांचा टप्पा ओलांडला. 

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील घसरणीला आज ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यानं सेन्सेक्स वधारला. गेल्या काही दिवसात सेन्सेक्स 4 टक्क्यांनी घसरला होता, आजच्या तेजीमुळं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.  सेन्सेक्स 900 अंकांनी वधारुन 80015.90 अंकांवर पोहोचला तर एनएसईवर निफ्टी 50 निर्देशांक 24765.90 अंकांवर पोहोचला. 

बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.44 टक्क्यांनी वाढला तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 1.38 टक्क्यांनी वाढला. शेअर बाजार आज अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं झालेल्या नुकसानातून सावरताना दिसून आला. भारतीय रुपया कालच्या तुलनेत सुधारला असून 91.60 रुपये डॉलरवर पोहोचला आहे. 

गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले 

भारतीय शेअर बाजारात काल झालेल्या घसरणीमुळं सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 457 लाख कोटींवरुन घसरुन 447 लाख कोटींवर आलं होतं. आजच्या 900 अंकांच्या तेजीमुळं  453 लाख कोटी रुपयांवर आलं आहे. म्हणजेच आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

गेल्या चार दिवसांमध्ये सेन्सेक्समध्ये 3160 अंकांची घसरण झाली होती. त्यामध्ये आज सुधारणा झाली. आज सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला आहे. इराणनं अणवस्त्र कार्यक्रम सशर्त थांबवण्याचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चा समोर आल्यानं आणि संघर्ष थांबण्याची चिन्ह समोर आल्यानंतर  बाजार मजबूत झाला असं, जिओजित इन्वेस्टमेंटस लिमिटेडचे विनोद नायर यांनी म्हटलं. 

भारतीय शेअर बाजारात आज रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी, एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये तेजीदिसून आली. तर, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. 

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात काल सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण झाली होती. गुंतवणूकदारांचं काल 10 लाख कोटींचं नुकसान झालं होतं. तर, मंगळवारी सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरल्यानं गुंतवणूकदारांचं 7 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

भारतीय शेअर बाजारात आज एलटी फूडसच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. एलटी फूडसचा शेअर 15 टक्क्यांपर्यंत वधारला. एलटी फूडसच्या शेअरनं 416 रुपयांचा टप्पा गाठल्याचं पाहायला मिळालं. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तरुणांना देशसेवा करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यास उरला फक्त एक दिवस, जाणून घ्या सविस्तर माहिती 
तरुणांना देशसेवा करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यास उरला फक्त एक दिवस, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Price: युद्ध थांबताच दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; चांदीचा भावही झाला कमी, तुमच्या शहरातील आजचे दर किती? जाणून घ्या
युद्ध थांबताच दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; चांदीचा भावही झाला कमी, तुमच्या शहरातील आजचे दर किती? जाणून घ्या
व्हिएतनामच्या कंपनीकडून महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, 5 हजार एकरवर विविध प्रकल्प उभारणार, 25 हजार रोजगार निर्माण होणार
व्हिएतनामच्या कंपनीकडून महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, 5 हजार एकरवर विविध प्रकल्प उभारणार, 25 हजार रोजगार निर्माण होणार
महागाईच्या काळात 'या' बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा, कर्जाचे दर केले कमी, जाणून घ्या सविस्तर माहिती
महागाईच्या काळात 'या' बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा, कर्जाचे दर केले कमी, जाणून घ्या सविस्तर माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttar Pradesh Accident: गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, महाराष्ट्रातील दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Baramati byelection 2026: बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
Vijay Thalapathi: अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..
अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget