TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 31 डिसेंबर 2024 : ABP Majha
राज्यातील सरपंच संघटनांकडून संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आजपासून 3 दिवस कामबंद आंदोलन,ग्रामपंचायतींसमोर काळ्याफिती बांधून आंदोलन करणार.
प्राजक्ता माळीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, माझ्या वक्तव्याचा गैर अर्थ काढण्यात आला, कुणाचंही मन दुखावलं असल्यास दिलगिरी, सुरेश धस यांचं वक्तव्य.
प्राजक्ता माळी विषय माझ्यासाठी संपलाय, संतोष देशमुख प्रकरणावरुन लक्ष विचलित करु नका, सुरेश धस यांचं वक्तव्य.
मुख्यमंत्री फडणवीसांनी बीड प्रकरणात यंत्रणा कामाला लावलीय, मात्र तपासात अडथळा येईल अशी विधानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी न करण्याच्या बावनकुळेंच्या सूचना
बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाहीय म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, सुरेश धस यांची मागणी
पालकमंत्री कोणाला द्यावं हा महायुतीचा प्रश्न, पण बीड जिल्ह्यात अजितदादांनी पालकमंत्रिपद घ्यावं किमान त्यांचे सोंगाडी काय करतात हे पाहण्यासाठी तरी, खासदार बजरंग सोनवणेंचा टोला.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शस्त्रपरवाने रद्द करण्याची मागणी केली, सुरेश धस यांची माहिती, चिरीमिरीच्या बदल्यात बंदुकीचे परवाने मिळणार असतील तर बीड जिल्हा बिहारच नाही तर त्याही पुढे जाऊन काबूल होईल, धस यांची टीका
वाल्मिक कराडला पोलिसांची मदत आहे का याची माहिती घेणं सुरुय, बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांची माहिती, तर शस्त्र परवान्यांची तपासणी सुरु असून गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द करणार, कॉवत यांचा इशारा
बीडमध्ये सीआयडी पथकाकडून एका महिलेची तब्बल चार तास चौकशी, चौकशीनंतर बीड पोलीस ठाण्यातून संबंधित महिलेची सुटका.
वाल्मिक कराडवर जाणीवपूर्वक कारवाई होत नाही, लोक विसरून जाण्याची वाट पाहतायत, मकोका लावणार असं सभागृहात सांगितलं होतं पण अजून काहीच कारवाई नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका.