Datta Gade News | आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेषातील फोटो समोर,पोलीस असल्याचं सांगून करायचा फसवणूक
Datta Gade News | आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेषातील फोटो समोर,पोलीस असल्याचं सांगून करायचा फसवणूक
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा पोलिसाच्या वेशातील फोटो समोर आला आहे. तोतया पोलीस बनून दत्ता गाडेने अनेकांना गंड घातल्याची माहिती उघड झाली आहे. दत्ता गाडेला २०२४ ला स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये आढळलेला हा फोटो आहे. आपण पोलीस आहे अशी बतावणी करुन पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करु शकतो असं सांगत दत्ता गाडे अनेक मुलींशी ओळख वाढवायचा. दत्ता गाडेने परिधान केलेला हा पोलिसाचा गणवेश नक्की कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याचा होता की त्याने तो शिवून घेतला होता याचा तपास सुरु आहे. अशाप्रकारे गणवेश घालून एक आरोपी जर गुन्हे करत होता तर ही बाब पोलिसांच्या लक्षात आली नाही का असाही प्रश्न उपस्थित होतोय.
महत्त्वाच्या बातम्या























