Manoj Jarange on Maratha Reservation : 5 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथ, मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
Manoj Jarange on Maratha Reservation : 5 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथ, मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
मनोज जरांगेंनी राज्य सरकारला नवा अल्टीमेटम दिला असून 5 जानेवारी पर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं जरांगे म्हणालेत. सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहे अस म्हणत आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. सरकारने 5 जानेवारी पर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात नसता मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करणार असा इशारा जरांगे यांनी दिलाय.
ही बातमी पण वाचा
गृहमंत्रिपद कुणाला मिळणार, पहिल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य!
मुंबई : राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झालं आहे. या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करत आहेत. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिली सही गरजू रुग्णाला आर्थिक मदत देण्यासाठी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांनी पहिली-वहिली मुलाखत एबीपीला दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदावर भाष्य केलं आहे.
खातेवाटप जवळजवळ पूर्ण झालं
आम्हा तिन्ही पक्षांना जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळावीत असं वाटतं. जेव्हा एखाद पक्ष चालवायचा असतो तेव्हा नेत्यांना संतुष्ट करावं लागतं. त्यामुळे खातेवाटपावर आमची चर्चा चालू आहे. आमची ही चर्चा आता जवळ-जवळ संपत आली आहे. आमचं मंत्रिपदांचं वाटप जवळजवळ पूर्ण झालं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
16 डिसेंबरच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. त्यामुळे 16 डिसेंबरच्या अगोदरच आम्ही आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. गृहमंत्रिपदाबाबत आमची चर्चा चालू होती. मात्र या पदावरून आमच्यात ओढाताण वगैरे होतेय, असं काहीही नाही, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.