Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद दौऱ्यावर; मदतीसंदर्भात घोषणा करणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री आज परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या नुकसानीची पाहणी करतील. परवा सोलापूर दौरा करुन त्यांनी नुकसानीची पाहणी केली होती. मात्र मदतीबाबत कुठलीही घोषणा केली नव्हती. त्यामुळं आज मुख्यमंत्री मदत जाहीर करणार का याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली असून जनावरंही दगावली आहे. पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.




















