(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anuskura Ghat Ratnagiri Monsoon : अणुस्कुरा घाटात निसर्गाचं सौंदर्य बहारलं : ABP Majha
Anuskura Ghat Ratnagiri Monsoon : अणुस्कुरा घाटात निसर्गाचं सौंदर्य बहारलं : ABP Majha
पाऊस सुरू झाल्यानंतर आता निसर्ग सौंदर्य चांगलंच बहरलं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटातील बहरलेला हेच निसर्ग सौंदर्य तुम्हाला भुरळ घालते. याच अणुस्कुरा घाटातून प्रवास करताना हिरवा शालू पांघरलेल्या डोंगर रांगा, ढगांचा सुरू असलेला लपंडाव, निरव शांतता आणि अंगाला झोपणारा गार गार वारा. हे सारं अनुभवण्यासाठी तुमची पावलं क्षणभर का असेना इथे नक्की थांबतात. निसर्गाचा हा साज पाहिल्यानंतर तुमच्या कल्पनाशक्तीला देखील धुमारे फुटतात. डोळ्यांचं पारणे फेडणारा हा नजारा पहिल्यानंत्तर तुमचं मन काही काळ इथेच घुटमळलं तर नवल ते काय? दरम्यान, मनाला खुणवणाऱ्या, निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडायला भाग पाडणाऱ्या याच अणुस्कुरा घाटातून आढावा घेतला आहे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी..