Latur News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 24 वर्षीय तरुणांने जीवन संपवलं
मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या अशी मागणी करत जिल्ह्यातील सावनगीर येथील 24 वर्षीय तरुणांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे... करण युवराज सोळुंके असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. बीकॉम चे शिक्षण झालेला करण सुशिक्षित बेरोजगार आहे. दोघा भावात पाच एकर शेती आहे. करण याने आत्महत्या केल्याचं सकाळी लक्षात आलं... गळफास घेऊन त्यांना आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका करणच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. निलंगा उप-जिल्हा रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्रित आले आहेत.



















