Raj Thackeeray masjid Bhonga : सत्ता द्या, शब्द देतो, मशिदीवर भोंगा दिसणार नाहीअमरावतीच्या सभेत बोलताना राज ठाकरेंनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी उद्धव ठाकरेेंनी हिंदूहृदय सम्राट शब्द वापरणं बदं केल्याचं राज ठाकरे म्हणाले...यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदीवरच्या भोंग्याच्या विषयाला हात घातला.. मनसेला सत्ता मिळाली तर मशिदीवर एकही भोंगा दिसणार नाही असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलंयहे ही वाचा..मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) लढवणार अशी घोषणा केली होती.मात्र त्यानंतर निवडणूक न लढवता पाडापाडी करणार असल्याची भूमिका जाहीर केली. यावर राज ठाकरे यांनी तुम्ही आरक्षण कसं मिळवून देणार?, येवढं मला सांगा असं सवाल उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या या विधानावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.